सोलापुर शहर भटक्या विमुक्त जाती जमाती विभागाच्या (VJNT) अध्यक्षपदी भारत जाधव यांची फेरनिवड...!
सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब, प्रदेश कार्याध्यक्षा आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या शिफारसीनुसार, महाराष्ट्र प्रदेश भटक्या विमुक्त जाती जमाती विभागाचे अध्यक्ष पल्लवीताई रेणके यांनी सोलापुर शहर भटक्या विमुक्त जाती जमाती विभागाच्या (VJNT) अध्यक्षपदी भारत जाधव यांची फेरनिवड केली. त्यांचे निवडीचे पत्र जनवात्सल्य कार्यालय सात रस्ता येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्षा आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते , सोलापुर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले.
यावेळी सुभाष चव्हाण, लक्ष्मण भोसले, नागनाथ गायकवाड़, दशरथ गायकवाड, सुमन जाधव, मोतीराम राठोड, हमजु मास्तर शेख, पवन गायकवाड़, रजाक शेख, पप्पू गारे, भीमराव बंडगर, शंकर धोत्रे, पंडित लांडगे, शंकर पवार, अंबादास जाधव (कवी), रमेश राठोड आदिंची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना नूतन अध्यक्ष भारत जाधव म्हणाले की, सोलापुर भटक्या विमुक्त जाती जमाती विभागाच्या शहर अध्यक्षपदी माझी फेरनिवड करण्यात आली हे माझ्यासाठी विशेष आहे. कारण आपण करत असलेल्या कामामध्ये सातत्य, मेहनत व लगन, निष्ठा असेल तर नेत्यांचा विश्वास कायम राहतो त्यामुळेच माझी अध्यक्षपदी फेरनिवड झाली हे पक्षातील सक्रिय कार्यकर्त्यांसाठी फार आशादायी चित्र आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब, आमदार प्रणितीताई शिंदे यांनी दाखविलेल्या विश्वासामुळे माझ्यावरील जबाबदारी अधिकच वाढली आहे. भटक्या विमुक्तांचे प्रश्न, त्यावरील समाधान व पक्ष बांधणी या तीनही पातळीवर कृतीतून न्याय देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. सुशीलकुमार शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना बजेट मध्ये भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी चारशे कोटी आर्थिक तरतूद करून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्याचे कार्य केले होते. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन आमदार प्रणितीताई शिंदे भटक्या विमुक्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब, आमदार प्राणितीताई शिंदे, प्रदेश अध्यक्ष पल्लवीताई रेणके यांनी माझ्यावर दाखविलेल्या विश्वासासाठी मी त्यांची आभारी आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन यासर्वांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहरांमध्ये काँग्रेस पक्षाची विचारधारा तळागाळात पोचविण्यासाठी रात्रीचा दिवस करणार असून येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्ष हाच सर्वसामान्यांना न्याय देणारा पक्ष असल्यामुळे राज्यात आणि देशात परिवर्तन होणार असून या परिवर्तनाच्या लढाईमध्ये आपण काँग्रेस पक्षाचा शिपाई म्हणून काँग्रेस पक्षाचे विचार शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करू. यापुढे जोमात काम करणार आसल्याचे भारत जाधव यांनी शेवटी सांगितले.
.png)
No comments:
Post a Comment