एनटीपीसी च्या गेट समोरच प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मांडला ठिय्या...! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 24, 2023

एनटीपीसी च्या गेट समोरच प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मांडला ठिय्या...!

 एनटीपीसी च्या गेट समोरच प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मांडला ठिय्या...! 

हलगी नाद आंदोलनामुळे एनटीपीसीला येणार का जाग..!! 

सोलापूर (कटू सत्य वृत्त) :- दक्षिण सोलापूर तालुक्यातील आहेरवाडी,  होटगी स्टेशन , फताटेवाडी आणि तिल्हेहाळ या गावातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आणि चार गावच्या सरपंचानी एकत्र एनटीपीसीच्या विरोधामध्ये हलगी नाद आंदोलन आणि आमरण उपोषण कंपनीच्या गेट समोरच सुरू सुरू आहे.

होटगी स्टेशनचे सरपंच  जगन्नाथ गायकवाड यांनी यासंदर्भात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून जोपर्यंत न्याय भेटणार नाही तोपर्यंत आम्ही आमचे आंदोलन आणि आमरण उपोषण मागे घेणार नसल्याचे जाहीर केला आहे. 

फता टेवाडी चे सरपंच हरिश्चंद्र राठोड  या संदर्भात बोलताना म्हणाले, एनटीपीसीचे व्यवस्थापक अधिकारी वर्ग आमच्या चार गावच्या प्रथम नागरिकांना सुद्धा सन्मानाची वागणूक न देता अरे रवीची भाषा करत आहे त्याचबरोबर या कंपनीमध्ये आमच्या भागातील भूमिपुत्रांना नोकरी दिली पाहिजे आणि तशा प्रकारचा शब्द कंपनीने दिला होता परंतु तो आज पाळलेला नाही. 

ठेकेदारांमार्फत बाहेरील लोकांना या ठिकाणी का मिळत असेल आणि आमच्या तरुणांना डावल जात असेल तर आम्ही हा अन्याय किती दिवस सहन करायचा असा प्रश्न सरपंच राठोड यांनी कंपनीला विचारला आहे. 

तसेच या कंपनीने आमच्या चार गावांना मोफत वीज पुरवठा देण्याचे सुद्धा मान्य केलेले होते परंतु तो सुद्धा शब्द त्यांनी पाळलेला नाही त्याच बरोबर ग्रामपंचायतीला मिळणारा कर सुद्धा देण्यासाठी एनटीपीसी टाळाटाळ करत असल्यामुळेच आम्ही आता आम्हाला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही असेही यावेळी सरपंच हरिश्चंद्र राठोड यांनी यावेळी बोलताना शेवटी सांगितले. 

तसेच ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर हा प्रकल्प उभा राहिला त्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना त्यांचा राहिलेला मोबदला सुद्धा अद्याप मिळालेला नाही त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये प्रचंड नाराजी पसरल्यामुळे या आंदोलनाला या पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी पूर्ण पाठिंबा दिला असून महिला वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणात या आंदोलनामध्ये सहभागी झाल्यामुळे आणि पोलिसांनी जो बंदोबस्त केल्यामुळे हे आंदोलन यशस्वी होत असल्याचे दिसत आहे. 

या हलगी नाद आंदोलन प्रसंगी फताटेवाडी चे सरपंच हरिश्चंद्र राठोड, होटगी स्टेशनचे सरपंच जगन्नाथ गायकवाड,  आहेरवाडी चे सरपंच नरसप्पा दिंडोरे ,  गोविंद वलेकर (तिल्हेहाळ) , उपसरपंच राजेंद्र जाधव,  कुणाल टक्के ,युवराज राठोड,  नीलम ताई भोसले,  मीनाताई गोरे,  वैशाली ढेरे,  दिपाली राठोड , सायदा बल्लोल खान, शर्मिला राठोड,  योगीराज पाटील  आधी सह या चार गावातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यासह नागरिक आणि बहुसंख्य महिला मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages