संतनाथ महाराज यात्रा ;
वैरागमध्ये विविध कार्यक्रम
वैराग (कटूसत्य वृत्त):-बार्शी तालुक्यातील वैराग येथील ग्रामदैवत श्री संतनाथ महाराज यांच्या यात्रेनिमित्त २६ ते ३१ ऑगस्ट या काळात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, बुधवारी नारळी पौर्णिमाच्या मुख्य दिवशी दहीहंडी होणार असल्याची माहिती सच्चिदानंद संतनाथ महाराज देवस्थान समितीचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी दिली.
यात्रेला शनिवारी सकाळी मानकरी व गावकऱ्यांच्या उपस्थितीत होईल. शनिवारपासून मंगळवारपर्यंत दररोज रात्री ८.१५ रावण चव्हाण महाराज व नंदू महाराज रणशूर यांचे प्रवचन, रात्री ९.१५ वाजता ह. भ. प. प्रसादबूवा सहस्रबुद्धे यांचे हरिकीर्तन, रात्री १२ च्या पुढे पालखीची नगरपरिक्रमा होणार आहे. ३० 'रोजी नारळी पौर्णिमा हा यात्रेचा मुख्य दिवस असून पहाटे ५.१५ वाजता धामणगावकर बोधले महाराज वंशजांचा जोग, दुपारी २ वाजता पालखीची मुख्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. यावेळी गावातील विविध लेझिम, झांज, ढोल पथकांचा नेत्रदीपक खेळ होणार आहे. संध्याकाळी सात वाजण्याच्या दरम्यान गाव तलावाजवळ दहीहंडीचा कार्यक्रम व त्यानंतर शोभेचे दारूकाम होणार आहे. ३१ रोजी दुपारी तीन वाजता तीन ठिकाणी कुस्त्यांच्या फडाचे आयोजन करण्यात आलेले आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानच्यावतीने करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment