जय जगदंबा विद्यालयाचे कुस्ती स्पर्धेत यश
वैराग: तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांसह शिक्षकवृंद.
वैराग ( कटूसत्य वृत्त):- कै.शिक्षणमहर्षी बाळासाहेब कोरके यांच्या ढवळस येथील जय जगदंबा विद्यालयाने तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत यश संपादन केले आहे. विद्यालयातील विद्याथ्र्यांनी कुस्तीमध्ये १४ वर्षे वयोगट, ४१ किलो वजनी गटातून पृथ्वीराज आवताडे, तर ४४ किलो वजनी गटात शंभू लोकरे आणि ४८ किलो वजनी गटात धीरज लोकरे याने प्रथम क्रमांक पटकावला.
या स्पर्धेत ६८ किलो वजनी गटात ओंकार घुगे याने द्वितीय क्रमांक पटकावला. १७ वर्षे वयोगटातून गिरको रोमन कुस्ती ४५ किलो वजनी गटात शंभू काळे याने प्रथम क्रमांक पटकावला, तर ४८ किलो वजनी गटात रोहन अनभुले याने प्रथम क्रमांक पटकावला. ५५ किलो वजनी गटात शुभम मोटे द्वितीय, तर १७ वर्षे फ्री स्टाईल कुस्ती गटात ५१ किलो वजनी गटात रोहन तोरसकर याने प्रथम, ६५ किलो वजनी गटात यश पवार प्रथम, तर ४५ किलो वजनी गटात आदित्य काळुखे याने द्वितीय तसेच ४८ किलो वजनी गटात वैभव आलदर याने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. याशिवाय ५५ किलो वजनी गटात तेजस जगताप याने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. विद्यालयातील या सर्व विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ कपिल कोरके, सचिव डॉ. अमिता कोरके, माजी जि.प. सदस्या सुरेखा कोरके, मुख्याध्यापक बाळासाहेब देशमुख,आबा शिंदे क्रिडा शिक्षक श्री रामहरी कांबळे सर यांनी विशेष मार्गदशन केले. तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

No comments:
Post a Comment