साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे गौरव पुरस्काराची घोषणा.... - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, August 25, 2023

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे गौरव पुरस्काराची घोषणा....

 साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे गौरव पुरस्काराची घोषणा....

28 ऑगस्ट रोजी होणार वितरण


सोलापूर  (कटूसत्य वृत्त):-साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सांगता समारंभा निमित्त मातंग एकता आंदोलन व शहर उत्तर युवक काँग्रेस सोलापूर यांच्या वतीने देण्यात येणान्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे गौरव पुरस्काराची घोषणा मातंग एकता आंदोलनाचे युवक जिल्हाध्यक्ष, युवक काँग्रेस उत्तरचे अध्यक्ष महेश लोंढे यांनी पत्रकार परिषदमध्ये केली.

गेल्या सोमवारी 28 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता डॉ निर्मलकुमार फडकुले सभागृहात या पुरस्काराचे वितरण व शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य ग्रामीण भागातील मुलींना पाच सायकली व समाजातील महिलांना साड्याचे वाटप माजी गृहराज्यमंत्री तथा मातंग एकता आंदोलनाचे संस्थापक रमेश दादा बागवे यांच्या अध्यक्षतेखाली आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते डॉ राजेंद्र माने (पोलीस आयुक्त, शिरीष सरदेशपांडे (ग्रामीण पोलीस अधीक्षका व उत्तमप्रकाश खंदारे (मा.क्रीडा राज्यमंत्री), अविनाश बागवे (पुणे), विठ्ठल वीरात, मनीषा मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.) प्रमुख पाहुणे म्हणून तर चेतन नरोटे (शहराध्यक्ष काँग्रेस), विश्वनाथ चाकोते (मा. आमदार), प्रकाश वाले, गणेश डोंगरे, अरुण गायकवाड, रामभाऊ वाघमारे, ज्येष्ठ नेते सुहास शिंदे भैरू लोडे, विनोद भोसले, मध्यवर्ती अध्यक्ष श्रीकात देडे, चंद्रकला खंडागळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

याप्रसंगी उपनिवासी जिल्हाधिकारी शमा पवार, सोमपा अधिकारी जगन्नाथ बानसोडे प्रशासकीय क्षेत्र) कुमार करजगी, राजू राठी, अंबादास हजारे (उद्योजक क्षेत्र) जनहित शेतकरी संघटना अध्यक्ष प्रभाकर भैय्या देशमुख, कामगार नेता बापू सदाफुले प्रयास संस्था सचिन शिंदे (सामाजिक क्षेत्र), रोहित आमले, सचिन जाधव (वैद्यकीय क्षेत्र), अंड शैलेश पाटफाड, अंड मयूर खरात (वकील) क्षेत्र), निवासी संपादक पुढारी संजय पाठक, tv9 प्रतिनिधी सागर सुरवसे (पत्रकारिता क्षेत्र) श्रीनाथ लोंडे (शिक्षण क्षेत्र) सदानंद कसबे (पोलीस क्षेत्र), आंतरराष्ट्रीय योगासन खेळाडू प्राध्यापिका तृप्ती अवताडे (क्रीडा क्षेत्र) यांना अण्णाभाऊ साठे गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. गौरवचिन्ह प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहॆ. या पत्रकार परिषदेला शहर युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, निखिल पवार, मनोज साबळे, ओंकार पवार, गणेश वाघमारे, सिध्दार्थ पवार, शरद वाघमोडे, आदित्य शिंदे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages