ॲड. चंद्रकांत नाईकवाडे यांची सरकारी वकीलपदी नियुक्ती
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहाय्यक सरकारी अभियोक्ता ( वर्ग -अ) पदी सोलापूर येथील ॲड. चंद्रकांत नाईकवाडे यांची नुकतीच निवड झाली आहे. सन 2022 च्या सरळ सेवा भरती पद्धतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता (वर्ग -अ ) या पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या लेखी व मौखिक परीक्षेत ते यशस्वी झाल्याने ॲड. चंद्रकांत नाईकवाडे यांची निवड झाली आहे. सध्या ते बार्शी येथील न्यायालयात विशेष सहा. सरकारी वकील म्हणून कार्यरत आहेत. तसेच विधि क्षेत्रात गेली सोळा वर्षापासून कार्यरत आहे. अमोघसिद्ध नाईकवाडे यांचे ते सुपुत्र आहेत त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे

No comments:
Post a Comment