कंदलगावात कृषीदुतांमार्फत लंपी लसीकरण शिबिराचे आयोजन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत लोकमंगल कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय वडाळा व कंदलगाव ग्रामपंचायत यांच्या सयुक्त विद्यामाने ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत प्राचार्य. नवनाथ गोसावी प्रा. प्रविण शेळके , प्रा. स्वप्नील कदम, प्रा. संजय वागमोडे , प्रा. स्मिता धाईगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. डॉ. संदीप पवार व कृषीदूत यांनी रोगाची लक्षणे, रोगाचा प्रसार, रोगाची कारणे, व लंपी रोगाचे नियंत्रण याविषयी शेतकऱ्याना मार्गदर्शन केल. कृषीदुतांमार्फत लंपी त्वचारोग लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. सोमनाथ रेवणसिद्ध घाटनुरे, विवेकानंद टिंगरे, चन्नपा कोरे, विठ्ठल देवकाते, महादेव डोळे, शोभा टिंगरे, करण नामदेव अवताडे यांच्या गोठ्यावर डॉ. संदीप पवार, गावचे सरपंच धनेश कडते यांच्या हस्ते सुरवात केली. प्रत्येकाच्या गोठ्यावर जाऊन डॉक्टरांनी लस दिली संसर्गाचा धोका लक्षात घेऊन ही उपाययोजना करण्यात आली होती. यावेळी जवळपास या शिबारामध्ये 100 ते 150 गाईचे लसीकरण करण्यात आले.

No comments:
Post a Comment