ॲड. वैशाली बनसोडे यांची सरकारी वकील पदी नियुक्ती - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 24, 2023

ॲड. वैशाली बनसोडे यांची सरकारी वकील पदी नियुक्ती

 ॲड. वैशाली बनसोडे यांची सरकारी वकील पदी नियुक्ती

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहाय्यक सरकारी अभियोक्ता ( वर्ग -अ) पदी सोलापूर येथील  ॲड.वैशाली बनसोडे(शिवशरण) यांची नुकतीच निवड झाली आहे. सन 2022 च्या सरळ सेवा भरती पद्धतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता (वर्ग -अ ) या पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या लेखी व मौखिक परीक्षेत ते यशस्वी झाल्याने ॲड.वैशाली बनसोडे यांची निवड झाली आहे.  सध्या ते सोलापूर येथील जिल्हा सत्र व न्यायालयात विशेष सहा. सरकारी वकील म्हणून कार्यरत आहेत . विधि क्षेत्रामध्ये गेली बारा वर्षापासून कार्यरत आहेत. ॲड. वैशाली बनसोडे ह्या सोलापूर जिल्हा बार असोसिएशनच्या सहसचिवा  म्हणूनही त्यांनी उत्कृष्टपणे कामगिरी बजावली आहे. श्री बंमणा निंगप्पा बनसोडे यांच्या त्या कन्या आहेत त्यांच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages