एसव्हीसीएसची हुमनाबादे वक्तृत्व स्पर्धेत प्रथम
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- स्व. गोपाबाई दमाणी यांच्या स्मरणार्थ दमाणी प्रशाला येथे आयोजित केलेल्या आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत एस. व्ही. सी. एस. हायस्कूल एम. आय. डी. सी येथील इयत्ता ९वी या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी कु. श्रावणी हुमनाबादे हीने मोठ्या गटातून प्रथम क्रमांक मिळवला. अन्नदाता सुखी भव या विषयावर तिने आपले विचार मांडले. या स्पर्धेत शहरातील चाळीस शाळेतील २५१ स्पर्धक सहभागी झाले होते. त्यामध्ये श्रावणी हिने प्रथम क्रमांक मिळवला तर प्रशालेतील इयता ७वी या वर्गात शिकणारा साकल्प सुरवसे या विद्यार्थ्याने लहान गटातून उपांत्य फेरी गाठली. या विद्यार्थ्यांना धनंजय नकाते, शिवानंद परमशेट्टी आदींचे मार्गदर्शन लाभले. प्रशालेचे मुख्याध्यापक संगप्पा म्हमाणे यांनी श्रावणी हुमनाबादे हिस ५००/- रुपये व साकल्प सुरवसे यास २५१/- रुपये रोख बक्षीस देऊन गौरव केले यावेळी उपमुख्याध्यापक गिरमल बुगडे, पर्यवेक्षक विलास म्हमाणे व सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते. प्रशालेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

No comments:
Post a Comment