चंद्रयान ३ चे यशस्वी लँडिंगकरिता श्री सिध्देश्वर चरणी प्रार्थना
सोलापूर (कटुसत्य वृत्त): शक्तिशाली भारताच्या बुद्धीशाली शास्त्रज्ञांच्या कर्तबगारीचा अविष्कार म्हणजे चांद्रयान ३ ही मोहिम. भविष्याच्या दृष्टीने चंद्रावरील वातावरण, भौगोलिक परिस्थिती, चंद्राची गती याची महत्वपूर्ण माहिती या मोहिमेद्वारे मिळणार आहे. चंद्र केवळ पृथ्वीचा उपग्रह नाही तर तो नात्यागोत्यांपासून धार्मिक कुलाचारापर्यंतच्या विविध भावनांनी भारतीय समाजमनाच्या भावविश्वाशी एकरुप झालेलं प्रतिक आहे. अशा अनोख्या भावबंधासोबत भारतीय अंतराळ क्षेत्राची ताकद पुन्हा एकदा सिद्ध होणार असल्याच्या अभिमानामुळे या मोहिमेबद्दल तमाम भारतीयांमध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे. चंद्रयान बुधवारी सायंकाळी 06.04 मि.चंद्रावर उतरत आहे ते यशस्वीपणे उतरेल याबाबत खात्री आहे. त्या खात्रीतूनच चांद्रयानाचे लँडिंग यशस्वी व्हावे यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष प्रणिता ताई शिंदे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल यंग ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेस सेवादल यंग ब्रिगेड शहराध्यक्ष विवेक कन्ना व कार्याध्यक्ष धीरज बंदपट्टे यांच्या वतीने आज सोलापूर येथे श्री सिद्धरामेश्वर मंदिरामध्ये भारताच्या चंद्रायान 3 मोहीम यशस्वी होण्याकरिता प्रार्थना करण्यात आली. यावेळी सोलापुर महानगरपालिका परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, नूर अहमद नालवार, श्रीकांत दासरी, कल्याणराव चौधरी, सुभाष वाघमारे, नागेश शहापुरे, आनंद लंबा, महेश सल्ला, सिद्धार्थ मादगुंडी, श्रीनिवास दासरी, शुभम मंजुळकर, विजय विटेकर, बसवराज प्रचंडे, , अक्षय बिराजदार, आनंद लब्बा उपस्थित होते.

No comments:
Post a Comment