पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, August 18, 2023

पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन

 पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन

बार्शी (कटूसत्य वृत्त):- कवी रामचंद्र इकारे यांच्या अक्षरांची रांग(ललित लेखसंग्रह) व माणुसकीचं आभाळ (काव्यसंग्रह) या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा आयोजित केल्याची माहिती आनंदयात्री प्रतिष्ठान चे अध्यक्ष नागेश अक्कलकोटे यांनी दिली.
कवी कालिदास मंडळ,उमेद प्रतिष्ठान आणि आनंदयात्री प्रतिष्ठान यांच्यावतीने या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा महाराष्ट्राचे माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या अध्यक्षतेखाली व झारखंड राज्याचे उद्योग विभाग संचालक रमेश घोलप,ज्येष्ठ संपादक राजा माने,प्रख्यात साहित्यिक डॉ राजेंद्र दास आदींच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.
रविवार दि 20 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5.30 वाजता मोरया फंक्शन हॉल,ताडसौन्दने रोड,सुभाष नगर बार्शी येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.रामचंद्र इकारे यांनी बार्शीतील साहित्य व सांस्कृतिक चळवळीत अनेक वर्षे कार्य केले असून विविध दैनिकांमधून सातत्याने लिखाण करत आहेत.त्यांच्या या पुस्तक प्रकाशन  सोहळ्यास साहित्य रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन नागेश अक्कलकोटे, उमेश घोलप यांनी केले यावेळी प्रताप दराडे,हर्षद लोहार,जमीर कुरेशी,आबासाहेब घावटे,डॉ रविराज फुरडे ,उमेश ठोंबरे ,तन्मय इकारे,महादेव कोकरे  आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages