कृषि कन्यांमार्फत डिजिटल अँप संदर्भात ग्रामस्थांना मार्गदर्श न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, August 18, 2023

कृषि कन्यांमार्फत डिजिटल अँप संदर्भात ग्रामस्थांना मार्गदर्श न

 कृषि कन्यांमार्फत डिजिटल अँप संदर्भात ग्रामस्थांना मार्गदर्श न


 निमगाव (कटूसत्य वृत्त):- माळशिरस तालुक्यातील संगम (ता. माळशिरस) येथे महात्मा- फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत अकलूज च्या रत्नाई कृषि महाविद्यालया तर्फे ग्रामस्थांना डिजिटल अँप संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे  रत्नाई कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य आर जी नलावडे कार्यक्रम समन्वयक प्रा. एस. एम एकतपुरे तसेच प्रा. एम. एम चंदनकर, प्रा. एच व्ही कल्याणी
तसेच प्रा यांच्या मार्गदर्शनानुसार कृषि कन्या साक्षी सोनवणे, प्रियंका काळदाते पाटील गितांजली ढेकळे, वनश्री सुतार, साक्षी घाडगे, पूजा सलगर, गौरी. कुबेर, प्रियंका कोकरे, वर्षा गलंडे यांनी या मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या प्रसंगी कृषी मैत्रिणींनी शेतकऱ्यांना डिजिटल अपचे मार्गदर्शन केले.

 यामध्ये कृषि कन्यांनी माय एपीएमसी हा शेतकऱ्यांना असलेला अँप डाऊनलोड कसा करावा, त्याचा वापर कसा उपयुक्त करावा तसेच त्याचे होणारे फायदे याबद्दल शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली तरी शेतकऱ्यांनी त्वरित अँप डाऊनलोड करून त्यांना उत्तम प्रतिसाद दिला. तरी या उपक्रमाप्रसंगी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थिती नोंदवली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages