स्वातंत्र्यदिनानिमित्त लोकमंगल कृषी महाविद्यालयातील उपक्रमांचे आयोजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, August 19, 2023

स्वातंत्र्यदिनानिमित्त लोकमंगल कृषी महाविद्यालयातील उपक्रमांचे आयोजन

 स्वातंत्र्यदिनानिमित्त लोकमंगल कृषी महाविद्यालयातील उपक्रमांचे आयोजन

सोलापूर (कटुसत्य प्रतिनिधी):  महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्नीत व श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान वडाळा संचलित लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळा ता. उत्तर सोलापूर जि. सोलापूर अंतर्गत ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गवई वस्ती भंडारकवटे ता. दक्षिण सोलापूर येथे स्वातंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी कृषी सम्राट गटाच्या कृषी दुतांकडून शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊवाटप करण्यात आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, तरुण वर्ग व कृषी दूत व विद्यार्थी उपस्थित होते. तसेच स्वतंत्रदिनाच्या निमित्ताने भंडाराकवठे येथे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये वड, पिंपळ, चिंच, कडुनिंब, करंज आदी वृक्षांची लागवड करण्यात आली या विविध उपक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. सचिन फुगे सर व कार्यक्रम अधिकारी प्रा. आकाश अवघडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत महेश आढेगावकर, पंकज आयरे, संदीप चव्हाण, रोहित गडगे, रोहन कौराती, प्रथमेश कुदळे यांनी केले यावेळी उपस्थित भंडारकवठेचे नूतन सरपंच भीमाशंकर बबलेश्वर, यतीन शहा साहेब, ग्रामपंचायत सदस्य सोमनिंग कमळे, संंगप्पा बिराजदार, अमसिद्ध कमळे गुरुजी, धरप्पा तेली, चिदानंद मैंदर्गी, महेंद्र जोकारे, कल्पेश कांबळे, गौरीशंकर कोंरे व ग्रामविकास अधिकारी गाडेकर साहेब व ग्रामस्थ उपस्थित होते. एकंदरीत आजचा स्वतंत्र दिन अत्यंत आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages