लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळा येथे वृक्षारोपण व पंचप्रण शपथ सोहळा संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, August 19, 2023

लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळा येथे वृक्षारोपण व पंचप्रण शपथ सोहळा संपन्न

 लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळा येथे वृक्षारोपण व पंचप्रण शपथ सोहळा संपन्न


सोलापूर (कटुसत्य );- श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळा या महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत " मेरा मिट्टी मेरा देश " या उपक्रमां अनुसार पंचप्रण शपथ सोहळा आयोजित करण्यात आला होता. या शपथ सोहळ्यासाठी सर्वप्रथम मुलांना कार्यक्रमाचा मुख्य उद्देश प्रा. अजित कुरे यांनी समजावून सांगितला. त्यानंतर पंचप्रण  शपथ सोहळा विद्यार्थी विद्यार्थिनी च्या उपस्थित पार पडला. याच कार्यक्रमा अंतर्गत महाविद्यालय प्रांगणात विद्यार्थ्यांनी श्रमदानातून विविध वृक्षांचे वृक्षारोपण केले. सदर कार्यक्रमास प्रा. आकाश अवघडे, प्रा. अजिंक्य ढोरे, प्रा. सुजाता चौगुले, प्रा. सोनाली मासाळ, प्रा. नम्रता गोरे आणि  प्रा. ज्योती जाधवर व इतर महाविद्यालयीन सहकारी व विद्यार्थी उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages