निरोगी आरोग्यासाठी संतुलित आहार व दररोज व्यायाम आवश्यक -
डॉ. रोहित कोरे हटकरवाडी येथील शिबिरात 77 जणांची मोफत तपासणी
माढा (कटूसत्य वृत्त):- सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या,धावपळीच्या व धकाधकीच्या युगात अनेकजण भरपूर पैसा, मान, सन्मान व प्रतिष्ठा कमावण्यासाठी अहोरात्र धडपड व प्रयत्न करतात परंतु यावेळी त्यांचे निरोगी आरोग्य ठेवण्यासाठी कळत नकळत दुर्लक्ष होते त्यामुळे विविध विकार व व्याधी जडतात.यावर रामबाण उपाय म्हणजे प्रत्येकाने दररोज संतुलित व पौष्टिक आहार घेऊन दररोज योगासने व प्राणायामासह व्यायाम करावा असे आवाहन डॉ.रोहित कोरे यांनी केले आहे. ते कापसेवाडी-हटकरवाडी ता.माढा येथे मैत्रीवेड फाऊंडेशन व आरोग्य विभागाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराच्या वेळी बोलत होते. शिबिराचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीरंग बगडे व फाउंडेशनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर बगडे यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात शुगर,रक्तदाब,सांधेदुखी, गुडघेदुखी,सर्दी,खोकला,मधुमेह, महिला व लहान मुलांचे विविध आजारांची तपासणी करून त्यांना मोफत गोळ्या-औषधे व लहान मुलांना टॉनिक संयोजकांच्या वतीने देण्यात आले.या शिबिरात एकूण 77 जणांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
प्रास्ताविक करून आभार फाउंडेशनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर बगडे यांनी मानले. यावेळी सोसायटीचे उपाध्यक्ष अनंता बगडे,चेअरमन वैजिनाथ व्हळगळ, रंगनाथ बगडे,बबन बगडे,अनिल सदगर,सागर बगडे,रविकांत करवर,वैजिनाथ सदगर,अभिमान बगडे,धनाजी बगडे,सुजित बगडे, बाळराजे बगडे,युवराज बगडे,अमित बगडे,समर्थ बगडे यांच्यासह ग्रामस्थ व युवक उपस्थित होते.
.png)
No comments:
Post a Comment