अभ्यासात सातत्य कष्ट करण्याची तयारी आणि आत्मविश्वास बळावर स्पर्धा परीक्षेत यश मिळते : संतोष चवरे
अनगर (कटूसत्य वृत्त):- स्पर्धा परीक्षांची तयारी ही अकरावीपासून करायला पाहिजे अभ्यास करताना जिद्द, सातत्य,कष्ट करण्याची तयारी आणि स्वतःबद्दल आत्मविश्वास असेल तर स्पर्धा परीक्षेत नक्कीच यशस्वी होता येते असे मत विद्याविकास स्पर्धा परीक्षा संकुलाचे संचालक संतोष चवरे यांनी अनगर येथे मांडले. नवीन शैक्षणिक धोरणाला अनुसरून अनगर येथील कै.शंकरराव बाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व कौशल्य शिक्षण यावर आधारित फॅशन डिझायनिंग, ब्युटी पार्लर,मेहंदी व केक बनविणे यावर एकदिवसीय कार्यशाळा पार पडली. डॉ.वैभव काळे यांनी भरतीपूर्व प्रशिक्षणाची स्वरूप व स्पर्धा परीक्षेचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. अनिता जाधव यांनी फॅशन डिझायनिंग,ब्युटी पार्लर,मेहंदी व केक बनवणे या विषयावर मार्गदर्शन केले. तर किरण पाटील यांनी कौशल्य विकास यावर मार्गदर्शन केले. संतोष टकले यांनी संगणक त्यामध्ये असणाऱ्या व्यवसायाच्या व नोकरीच्या संधी विषयावरती मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जुनिअर कॉलेजचे प्राचार्य चंद्रकांत ढोले हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. वैभव काळे हे होते. यावेळी रमेश चव्हाण, दाजी गुंड, सोमनाथ ढोले, उज्वला घोलप,शमा काझी, अर्चना गुंड, विनायक कोल्हाळ, पांडुरंग शिंदे संजय नीलकंठ, सत्यवान कांबळे, सोमनाथ ढोले, अंकुश सुरवसे,डॉ. प्रशांत कुलकर्णी आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
.png)
No comments:
Post a Comment