"एनटीपीसी च्या गेट समोर च"24 ऑगस्ट रोजी करणार आमरण उपोषण आणि हलगी नाद आंदोलन..! 4 गावच्या सरपंचांनी दिला इशारा...!!
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- दक्षिण सोलापूर तालुक्यातील आहेरवाडी, होटगी स्टेशन, फताटेवाडी आणि तिल्हेहाळ या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी एनटीपीसी या कंपनीच्या विस्तारीकरणासाठी गेल्या. परंतु सध्या एनटीपीसी काम करणारे व्यवस्थापक या गावातील लोकप्रतिनिधींना सन्मानाची वागणूक न देता अरेरावीची भाषा वापरत असून ग्रामपंचायतने दिलेला कर सुद्धा एनटीपीसी गेल्या दोन ते तीन महिन्यापासून भरण्यास टाळाटाळ करत असून या गावातील स्थानिक तरुणांना नोकरी देण्याचं आश्वासन कंपनीने पाळलं नसल्यामुळेच 24 ऑगस्ट रोजी आम्ही कंपनीच्या गेट समोरच हलगी नाद आंदोलन आणि आमरण उपोषण करणार असल्याची माहिती होटगी स्टेशनचे सरपंच जगन्नाथ गायकवाड यांनी श्रमिक पत्रकार परिषदेत दिली. श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत पुढे बोलताना गायकवाड म्हणाले, " एनटीपीसी च्या कंपनीने आम्हाला आमच्या गावांना मोफत वीज पुरवठा देण्याचे आणि आमच्या परिसरातील बेरोजगार तरुणांना नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते परंतु ते कंपनीने सध्या पाळी नसून इतर गावातील बेरोजगार तरुणांना नोकरी दिली जात आहे परंतु स्थानिक तरुणांना जाणून-बुजून दुर्लक्ष केलं जात आहे. चारी गावातील ग्रामपंचायतीने गावातील बेरोजगार युवकांच्या नोकरीसाठी लेखी आणि तोंडी निवेदन दिली परंतु एनटीपीसीचे अधिकारी रेड्डी आणि इतर कर्मचारी सरपंच आणि ग्रामसेवकांना अपमानास्पद वागणूक देत आहेत. तसेच या चारही गावातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना त्यांचा राहिलेला मोबदला सुद्धा अद्याप पर्यंत मिळालेला नाही त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये प्रचंड नाराजी पसरले आहे. या चारी गावातील तरुणांना आणि प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना या ठिकाणी काम मिळत नसून ठेकेदार बाहेरील कामगारांना कामास लावतात त्यामुळे या चारी गावातील बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे तरीसुद्धा आमच्या विनंतीला या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा मान मिळत नसून आमच्या अर्जांना केराची टोपली दाखवली जात आहे. त्यामुळे चार दिवसांमध्ये आमच्या मागण्या मान्य न झाल्यास 24 ऑगस्ट 2023 पासून आम्ही एनटीपीसी गेट समोर चार गावच्या सरपंच आणि ग्रामस्थांना घेऊन हलगीनाथ आंदोलन व आमरण उपोषण करणार आहोत. या निवेदनाच्या प्रती आम्ही जिल्हाधिकारी ,पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ,तहसीलदार ,गटविकास अधिकारी, वळसंग पोलीस स्टेशन, आणि एनटीपीसी व्यवस्थापक यांना दिले आहेत.
.png)
No comments:
Post a Comment