डोळ्याच्या साथी बरोबरच चिकनगुनिया पुन्हा काढतोय तोंड..!
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सध्या पावसाळा सुरू असून सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये डोळ्याची साथ मोठ्या प्रमाणात हैराण करत आहे. त्यात भर म्हणजे पुन्हा एकदा चिकनगुनियाने तोंड वर काढलेले आहे. पावसाळ्यात साथीच्या रोग नियंत्रणासाठी सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभाग सध्याच्या परिस्थितीमध्ये सतर्क असून डेंगू नंतर चिकनगुनिया या आजाराने आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढविले आहे. सोलापूर शहरांमध्ये चिकनगुनियांचे रुग्ण वाढत असून सध्या शहरात डेंगूचाही फैलाव सुरू असून त्यावर उपचार सुरू असून आरोग्य विभाग सतर्क असल्याची माहिती महापालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर बसवराज लोहारे यांनी दिली.
पावसाळ्यात विविध प्रकारच्या साथीच्या रोगांची लक्षण असलेले रुग्ण मोठ्या प्रमाणात दरवर्षी आढळतात. कोरोना महामारीनंतर असे संसर्गजन्य रोग वाढत आहेत. सोलापूर शहराला स्वच्छ आणि शुद्ध पाणी देण्यामध्ये महानगरपालिका अपयशी ठरत असल्यामुळेच साथीच्या रोगांना नागरिकांना बळी पडावे लागत असल्याचे बोलले जात आहे. सोलापूर शहरात महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहे. सोलापूर महापालिका आयुक्त शितल उगले केली यांनी आरोग्य विभागाला दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या असून फवारणी आणि धुराळणे तसेच सर्वेक्षणाचे काम वेगाने करण्याच्या सूचना दिल्याचे समजते.
आरोग्य विभाग सतर्क राहिल्यास परिस्थिती नियंत्रणात राहू शकते त्यामुळे आरोग्य विभागाने प्रामाणिकपणे काम करण्याची गरज असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.
No comments:
Post a Comment