मध्यान भोजन योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार..! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 10, 2023

मध्यान भोजन योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार..!

 मध्यान भोजन योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार..!

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- एक वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फार मोठे बंड झाल्यानंतर शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाले. गेल्या वर्षभरामध्ये फक्त घोषणा आणि गरिबांचे सरकार अशा प्रकारचं गुराळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गोडशैलीमध्ये गाळत आहेत. परंतु अनेक योजना हा नुसत्या कागदावर आणि भ्रष्टाचाराच्या खाईत माखलेल्या आहेत. लाखो बांधकाम कामगारांसाठी वरदान ठरलेली मध्यान भोजन योजना भ्रष्टाचाराच्या खाईत सापडले असून या योजनेत ठेकेदार कंपन्यांनी प्रचंड मोठा भ्रष्टाचार केल्याचे समोर आले आहे. शासन कोट्यावधी रुपये सामाजिक बांधिलकीतून बांधकाम कामगारांच्या पोटापाण्यासाठी खर्च करत असताना हा पैसा त्यांच्यासाठी न वापरता कंपन्यांचे भले करण्यासाठी निकृष्ट दर्जाचे भोजन देऊन अथवा भोजन न देता ही कामगारांच्या नावाने पैसे उकळणाऱ्या या ठेकेदारांमुळे आणि अशा प्रकारच्या कंपन्यांमुळे कामगारांवर मात्र मोठा अन्याय होत असल्याची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात जिल्ह्यामध्ये होताना दिसत आहे.
शालेय स्तरावर राबविण्यात येणारी विद्यार्थ्यांसाठी मध्यान भोजन योजना सुद्धा भ्रष्टाचाराच्याच चिखलामध्ये अडकली असताना बांधकाम कामगारांसाठी असलेली भोजन योजना सुद्धा भ्रष्टाचाराने पूर्णपणे बरबटलेली असल्यामुळे शासनाचा अपेक्षित हेतू साध्य न
होता विनाकारण पैशाचा चुरा होत असल्याचे सर्वसामान्य नागरिकांत बोलले जात आहे.
सरकारने खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत ही भोजन योजना पोहोचवण्यासाठी थेट बांधकाम कामगारांच्या बँक खात्यामध्ये भोजनाचे पैसे जमा केले तर ते पैसे कामगारांसाठी मोठी मदत मोठी वरदान ठरेल.
कोरोना सारख्या महामारीच्या काळात शिवभोजन थाळीने अनेक गोरगरिबांना फार मोठा दिलासा दिला परंतु सरकार बदलल्यानंतर ही योजना सुद्धा बदलली आणि थंडावली सुद्धा आहे.
या भ्रष्टाचारी ठेकेदारांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर खडक कारवाई करावी अशी मागणी सध्या जोर करत आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages