जिल्हा न्यायालय कळंब येथे ७६ वा स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा.
कळंब (कटूसत्य वृत्त):- येथील जिल्हा न्यायालय याठिकाणी देशाचा ७६ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा न्यायाधीश- तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती कळंब . आर. के. राजेभाेसले यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.
त्यावेळी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर . एन. ए. इंगळे, तिसरे सह दिवाणी न्यायाधीश . एम. ए. शेख, विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष अॅड. डी. एस. पवार, विधिज्ञ मंडळातील पदाधिकारी, जेष्ठ विधिज्ञ तसेच जिल्हा न्यायालय येथील अधीक्षक ए. पी. वालवडकर, दिवाणी न्यायाधीश व. स्तर येथील अधीक्षक एस. डी. एखंडे, सहाय्यक अधीक्षक डी. एम. पवार, एस. एम. गपाटे, सहदिवाणी न्यायालय येथील सहाय्यक अधीक्षक आर. एन. बोबडे तसेच इतर न्यायालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment