माजी सैनिकांचा गौरव व वृक्षारोपन करुन भाटशिरपुरा शाळेत केला स्वातंत्र्य दिन साजरा
भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्तान जिल्हापरिषद प्राथमिक शाळेत शाळेच्या वतीने गावातील माजी सैनिकांचा मानाचा फेटा,शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव तर ग्रामपंचायत च्या वतीने शाळेच्या परिसरात वृक्षलागवड करुन ७७ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.
कळंब (कटूसत्य वृत्त):- तालुक्यातील भाट शिरपूरा येथे दि.१५ आँगस्ट रोजी जिल्हापरिषद प्राथमिक शाळा येथे भारतीय स्वातंत्र्याचा ७७ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व, निबंध,चित्रकला,सुंदर हस्ताक्षर व सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेत इयत्ता १ ली ते ७ वीच्या सर्व विद्यार्थ्यानी सहभाग घेतला.
सकाळी ७-३० वाजता गावातून वाजत - गाजत उत्साहात प्रभात फेरी काढून नंतर मुख्याध्यापक बाळकृष्ण तांबारे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणात स्वातंत्र्याच्या इतिहास उलगडुन सांगितला. तसेच देश भक्तीपर गीतावर विद्यार्थीनींनी नृत्य सादर केले.माजी सैनिकांच्या वतीने श्री.सुर्यकांत खापे यांनी सैन्यातील आपले अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सरंच सौ.सुनिता दिलीप वाघमारे,चेअरमन श्री.अच्यूत बापु गायकवाड,उपसरपंच सुर्यकांत खापे, संभाजी ब्रिग्रेडचे अतुल गायकवाड,दिलीपराव वाघमारे,विकास गायकवाड , रमेश रितपुरे, शाळाव्यवस्थापन समिती अध्यक्षा श्रीमती प्रियंकाताई गायकवाड ,उपाध्यक्षा सौ,कीर्ती झोंबाडे ग्रामपंचायत सदस्य ,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व गावातील शिक्षणप्रेमी नागरीक उपस्थित होते.
संपुर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, शाळेतील शिक्षक सचिन तामाने,शहजी बनसोडे,राजाभाऊ शिंदे,लिंबराज सुरवसे, श्रीम.प्रमोदिनी होळे ,श्रीमती.रंजना थोरात यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापक बाळकृष्ण तांबारे यांनी केले तर सुत्रसंचलन श्रीकांत तांबारे तर आभार अमोल बाभळे यांनी मानले
चौकट
------------------------------ ---------------
या माजी सैनिकांचा केला गौरव
बाबुलाल बाशुमियाँ शेख,साईबाबा महेबुब शेख,निजाम शेख,शैफुद्दीन बाबुलाल शेख,युन्नुस गफुर शेख,सुर्यकांत बाबासाहेब खापे,गोपाळ अभिमान रितपुरे,
या माजी सैनिकांचा शाळेच्या वतीने गौरव करण्यात आला.
------------------------------ ---------------
चौकट
------------------------------ ---------------
शाळेसाठी साहीत्य व देगणी
मुख्याध्यापक बाळकृष्ण तांबारे यांच्या वतीने शाळेसाठी ६ हजार कीमंतीचे ८ मोठे आरसे, तसेच शिक्षक अमोल बाभळे यांनी शिक्षक म्हणून २५ वर्ष सेवा झाल्याबद्दल १ आँफीस टेबल, तर बदलून गेलेले शिक्षक संजय झिरमिरे यांनी शाळेला २ फँन भेट दिले. तसेच विद्यार्थ्यांना खाऊसाठी सुनिता वाघमारे, रमेश रितपुरे,सुर्यकांत खापे,अच्युत गायकवाड, युन्नुस शेख,शैफुद्दीन शेख, ग्रामसेवक श्रीमती सोनवने,पंडीत वाघमारे, बप्पासाहेब शिंदे,श्रीकांत गायकवाड यांनी रक्कम दिली.

No comments:
Post a Comment