कौशल्य विकास प्रशिक्षणामुळे ग्रामीण भागातल्या युवकांसाठी करिअरच्या उत्तम संधी -इंद्रजीत बागल - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 16, 2023

कौशल्य विकास प्रशिक्षणामुळे ग्रामीण भागातल्या युवकांसाठी करिअरच्या उत्तम संधी -इंद्रजीत बागल

 कौशल्य विकास प्रशिक्षणामुळे ग्रामीण भागातल्या  युवकांसाठी करिअरच्या उत्तम संधी -इंद्रजीत  बागल


यशस्वी  संस्थेचे 'यशोत्सवस्नेहसंमेलन   'यशोगाथाप्रकाशन  उत्साहात  संपन्न

पुणे(कटूसत्यवृत्त):-  कौशल्य विकास प्रशिक्षणामुळे ग्रामीण भागातल्या  युवकांसाठी करिअरच्या उत्तम संधी निर्माण झाल्या आहेतअसे प्रतिपादन आकाशवाणी पुणे केंद्राचे संचालक  इंद्रजीत बागल  यांनी व्यक्त केले.

यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स संस्थेच्या वतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित 'यशोत्सवस्नेहसंमेलनात ते  बोलत होतेयावेळी त्यांच्या हस्ते 'यशोगाथाविशेषांकाचे प्रकाशन करण्यात आलेस्किल डेव्हलपमेंट क्षेत्रात यशस्वी संस्थेने केलेले काम कौतुकास्पद असून विविध औद्योगिक आस्थापनांनी यशस्वी संस्थेच्या 'शिका आणि कमवा योजनेला दिलेला प्रतिसाद हा युवकांना  आत्मनिर्भरतेचा मार्ग उपलब्ध करून देत आहे असेही इंद्रजीत बागल यावेळी म्हणाले.या कार्यक्रमाला यशस्वी संस्थेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णीपंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्राच्या परिविक्षा अधिकारी योगिता पाटीलयशस्वी संस्थेचे संचालक राजेश नागरेसंजय छत्रेसंचालिका स्मिता धुमाळ आणि संस्थेचे मुख्य वित्त अधिकारी देविदास माळी व्यासपीठावर  उपस्थित  होते.

यावेळी आपल्या मनोगतात बोलताना पंडित जवाहरलाल नेहरूउद्योग केंद्र बालसुधारगृह येरवडाच्या परिविक्षा अधिकारी योगिता पाटील म्हणाल्या की,आमच्याकडे दाखल होणारी मुले ही साधारण वय वर्षे १४ ते १७ या वयोगटातील  असतातआयुष्यात हातून घडलेल्या एका चुकीच्या  गोष्टीमुळे ही अल्पवयीन मुले समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दुरावतात,'यशस्वीसंस्थेच्या  सहकार्याने आता  या मुलानांही कौशल्य  प्रशिक्षण देण्यात  येणार आहे.

या प्रसंगी  यशस्वी संस्थेद्वारे  विविध औद्योगिक  कंपन्यांमधून  शिका  कमवा आणि अप्रेन्टिस  योजनेतील ऑन   जॉब ट्रेनिंग पूर्ण  करून नामांकित औद्योगिक कंपन्यांमध्ये ऑन  रोल नोकरीची संधी प्राप्त झालेल्या  तसेच 'यशस्वीसंस्थेतील स्किल डेव्हलपमेंट  सेंटरमधून कौशल्य विकास प्रशिक्षण  पूर्ण  करून उद्योजकतेचा  मार्ग स्विकारलेल्या काही विद्यार्थी-विद्यार्थिनींचा  प्रातिनिधिक स्वरूपात  प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.तसेच  विद्यार्थ्यांनी  गायननृत्य असे विविध कलाप्रकार  सादर करण्यात आले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक  पाशवी संस्थेचे  मुख्य वित्त  अधिकारी देविदास माळी  यांनी तर आभार प्रदर्शन  यशस्वी संस्थेचे संचालक राजेश नागरे  यांनी  केलेतर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राणी दरंदले या विद्यार्थिनीने  केले.सामूहिक  राष्ट्रगीत  गायनाने  कार्यक्रमाचा  समारोप  झाला.

या कार्यक्रमासाठी दिलीप  पवार,अबिद  शेखज्ञानेश्वर  गोफण,राजेश  कदमईशा  फाटकप्राची राऊतशुभांगी  कांबळे आदींनी विशेष  सहकार्य केले.


१)  स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित   यशस्वी  संस्थेच्या यशोत्सव  कार्यक्रमात  'यशोगाथा' विशेषांकाचे  प्रकाशन करताना  व्यासपीठावर डावीकडून 'यशस्वी' संस्थेचे संचालक  राजेश  नागरे,यशस्वी संस्थेच्या  संचालिका स्मिता  धुमाळ, पंडित  जवाहरलाल  नेहरू उद्योग केंद्र, बालसुधार गृहाच्या  परिवीक्षा  अधिकारी  योगिता पाटील, आकाशवाणी  पुणे केंद्राचे संचालक इंद्रजीत  बागल,यशस्वी  संस्थेचे मुख्य वित्त  अधिकारी  देविदास माळी व यशस्वी संस्थेचे  संचालक  संजय  छत्रे       

२) स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित   यशस्वी  संस्थेच्या यशोत्सव  कार्यक्रमात   विद्यार्थ्यांना मार्गदर्शन  करताना 

 आकाशवाणी पुणे केंद्राचे संचालक  इंद्रजीत  बागल, यावेळी व्यासपीठावर बसलेले डावीकडून 'यशस्वी' संस्थेचे संचालक  राजेश  नागरे,यशस्वी संस्थेच्या  संचालिका स्मिता  धुमाळ, पंडित  जवाहरलाल  नेहरू उद्योग केंद्र, बालसुधार गृहाच्या  परिवीक्षा  अधिकारी  योगिता पाटील, यशस्वी  संस्थेचे मुख्य वित्त  अधिकारी  देविदास माळी व यशस्वी संस्थेचे  संचालक  संजय  छत्रे   

 

३)स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित  यशस्वी  संस्थेच्या यशोत्सव  कार्यक्रमात यशस्वी संस्थेद्वारे  ऑन  द जॉब  ट्रेनिंग  पूर्ण  करून  कंपनीत ऑन  रोल  नोकरीची  संधी  प्राप्त  झालेल्या विद्यार्थ्यांना  प्रशस्तीपत्र  प्रदान करताना आकाशवाणी  पुणे केंद्राचे  संचालक  इंद्रजीत  बागल, यावेळी त्याच्यासमवेत डावीकडून यशस्वी  संस्थेच्या संचालिका  स्मिता धुमाळ व पंडित  जवाहरलाल  नेहरू उद्योग केंद्र, बालसुधार गृहाच्या  परिवीक्षा  अधिकारी  योगिता पाटील.          

 

४)स्वातंत्र्यदिनानिमित्त  आयोजित  यशस्वी  संस्थेच्या यशोत्सव  कार्यक्रमात सहभागी  झालेल्या विद्यार्थ्यांना   प्रशस्तीपत्र  प्रदान करताना 'यशस्वी' संस्थेचे  अध्यक्ष  विश्वेश  कुलकर्णी.       

 

५)स्वातंत्र्यदिनानिमित्त  आयोजित  यशस्वी  संस्थेच्या यशोत्सव  कार्यक्रमात सहभागी  झालेल्या विद्यार्थ्यांना   प्रशस्तीपत्र  प्रदान करताना 'यशस्वी' संस्थेचे  अध्यक्ष  विश्वेश  कुलकर्णी.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages