बाळराजे पाटील उभी करतायेत तरुणांची फळी..! विरोधकांना मात्र झोपेची गोळी..!
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- सध्या राज्यात भाजप, शिंदे गट आणि अजित दादा गटाची सत्ता आहे. विकासाचं राजकारण आणि मतदार संघातील सर्वसामान्य नागरिकांची कामे होण्यासाठी प्राधान्य देणारा लोकप्रतिनिधी म्हणून माजी आमदार राजन पाटील यांची ओळख सर्वदूर आहे. पडत्या काळात सुद्धा जिल्ह्यामध्ये निष्ठा टिकवून ठेवणारे आमदार म्हणून राजन पाटील यांची ओळख आहे. त्यांच्याच संस्कार छत्रछायेखाली तयार झालेले मोहोळ तालुक्याचे भावी आमदार म्हणून ओळख निर्माण करणारे तरुणांचे आयडॉल म्हणून ओळखले जाणारे बाळराजे पाटील..! गेल्या अनेक वर्षापासून बाळराजे पाटील हे मतदार संघातील सर्वसामान्य माणसाच्या हाकेला प्रतिसाद देत असून गाठीभेटी आणि गाव भेट दौरा सातत्याने ते करत आहेत. सर्वसामान्य माणसाचा विकास झाला पाहिजे, तालुक्यात विकासाची कामे झाली पाहिजेत यासाठीच त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खंबीर पाठिंबा दिलेला आहे. एक सही विकासासाठी अजित दादांसाठी या उपक्रमाला मोहोळ तालुक्यातील हजारो मतदारांनी प्रतिसाद दिल्याचं नुकतंच दिसून आलं. लोकनेते बाबुराव अण्णा पाटील यांनी राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्त्व दिल्यामुळे आणि तेच संस्कार आज पर्यंत बाळराजे पाटील आणि अजिंक्यराणा पाटील यांनी जपल्यामुळे मोहोळ तालुक्यातील गावा गावांमध्ये या दोन्ही नेत्यांची क्रेज निर्माण झालेली दिसते आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष म्हणून बाळराजे पाटील यांनी अनेक धाडसी निर्णय घेऊन आपल्या कामाची चुणूक दाखवून दिली त्यामुळे त्यांच्या पाठीमागे मोहोळ तालुक्यासह जिल्ह्यातील तरुणाई म्हणजेच तरुणांची फळी ठामपणे उभी आहे. माजी आमदार राजन पाटील यांच्याप्रमाणेच सातत्याने जनसंपर्क ठेवणारे आणि राजकारणाची दूरदृष्टी ठेवून स्वतः वेगळी ओळख निर्माण करून तरुणांची फळी निर्माण करणारा युवा नेता म्हणून बाळराजे पाटील यांनी मोहोळ तालुक्याचे विकासाकडे मोठ्या प्रमाणात लक्ष दिला आहे. काम केल्याशिवाय सर्वसामान्य माणूस जवळ येत नाही हे संस्कार त्यांच्याकडे असल्यामुळेच ते मोहोळ तालुक्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या कोणत्याही कार्यक्रमाला हजेरी लावून जनसंपर्क सातत्याने वाढवत असल्यामुळे मोहोळ तालुक्यात पुन्हा एकदा लोकनेते परिवार सक्रिय असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे विरोधी पक्ष मात्र गटातटात अडकल्यामुळे फक्त सत्तेची फळे चाखण्यासाठीच एकत्र व्हायचं आणि त्यानंतर सर्वसामान्य माणसाला वाऱ्यावर सोडून द्यायचं असा कार्यक्रम विरोधी पार्टीत असल्यामुळे बाळराजे पाटील उभी करतायेत तरुणांची फळी तर विरोधकांना मात्र लागते झोपेची गोळी. अशी चर्चा सध्या मोहोळ तालुक्याच्या राजकीय रणांगणावर मोठ्या प्रमाणात होताना दिसते आहे.
.png)
No comments:
Post a Comment