सोलापूर शहर सेवादल यंग ब्रिगेडच्या वतीने मधला मारुती चौक येथे शाखा उद्घाटन, सभा संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, August 26, 2023

सोलापूर शहर सेवादल यंग ब्रिगेडच्या वतीने मधला मारुती चौक येथे शाखा उद्घाटन, सभा संपन्न

 सोलापूर शहर सेवादल यंग ब्रिगेडच्या वतीने मधला मारुती चौक येथे शाखा उद्घाटन, सभा संपन्न

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, सोलापुर शहर सेवादल यंग ब्रिगेडच्या वतीने मधला मारुती चौक आनंद हलवाई दुकान समोरच्या बोळात येथे सोलापुर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या हस्ते, महाराष्ट्र प्रदेश सेवादल यंग ब्रिगेड अध्यक्ष सुदीप चाकोते यांच्या अध्यक्षतेखाली, प्रवक्ते अशोक निंबर्गी, नागनाथ कदम, माजी नगरसेवक रवि यलगुलवार, ब्लॉक अध्यक्ष देवाभाउ गायकवाड, सोलापुर शहर सेवादल यंग ब्रिगेड अध्यक्ष विवेक कन्ना, युवा नेते राहुल वर्धा, राजेंद्र शिरकुल, धीरज बंदपट्टे, प्रतीक लिगाड़े आदिंच्या प्रमुख उपस्तितीत शाखा उद्घाटन व जाहिर सभा संपन्न झाली.

प्रतीक लिगाड़े यांनी आपल्या समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांची सोलापुर शहर यंग ब्रिगेडच्या शहर उपाध्यक्ष पदी निवड करून त्यांचे निवडीचे पत्र देण्यात आले.

यावेळी बोलताना चेतन नरोटे म्हणाले की, सोलापुर जिल्ह्यात सहा आमदार दोन खासदार असून सुद्धा सोलापुरचा विकास करू शकले नाही. शहरातील दोन आमदारांचे वाद जगजाहिर आहे. त्यामुळे सोलपुरची वाट लागली आहे. शहर ऊत्तर मध्ये स्मार्ट सिटीच्या नावाने दोन दोन वर्षे रस्ते खोदुन ठेवले होते. अजूनही कामे अर्धवट आहेत. मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. पन्नास खोकेवाले शिंदे फडणवीस सरकार ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले अश्या अजित पवार गटाबरोबर सत्ता स्थापन करून लोकांचे हाल करत आपल्याच राजकारणात व्यस्त आहेत. चंद्रयान-3 अंतराळ मोहिम, चंद्रावर तिरंगा हे केवळ नेहरूंच्या दूरदृष्टिमुळे शक्य झाले नालीतुन गैस काढणारे मोदीजी श्रेय घ्यायला पुढे आले आहेत पण मणिपुरची अत्याचाराची दंगलीची जबाबदारी घ्यायला मागे आहेत. म्हणून देशाच्या विकासासाठी युवकांची जबाबदारी वाढली आहे. आपले एक मत महत्वाचे आहे. देशाची सत्ता हलवायची ताकद युवकांमध्ये आहे, त्या ताकदीचा वापर करून जनताविरोधी मोदी सरकारला सत्तेवरुन पायऊतार करा असे आवाहन केले.

यावेळी सुभाष वाघमारे, नूर अहमद नालवार, श्रीकांत दासरी, योगेश सोलापुरे, गंगाधर स्वामी, धीरज बंदपट्टे, श्रीनिवास परकीपंडला, चेतन जव्हेरी, श्रीनिवास कोटा, नागेश शहापुरे, मोईन शेख, मुजाहिद नदाफ, आलम शेख, मशाक भाई, रवि हुंडेक़री, पंकज गावड, अमर गणेरी, गोटू फुलारी, राजू हुंडेक़री, दीपक वरगंटी, प्रशांत शिरकुल यांच्यासह पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages