"शासन आपल्या दारी" या धर्तीवर छावा संघटना करणार "पोलीस अवैध धंदेवाल्याच्या घरी" हे विडंबणात्मक आंदोलन..!! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 23, 2023

"शासन आपल्या दारी" या धर्तीवर छावा संघटना करणार "पोलीस अवैध धंदेवाल्याच्या घरी" हे विडंबणात्मक आंदोलन..!!

"शासन आपल्या दारी" या धर्तीवर  छावा संघटना करणार "पोलीस अवैध धंदेवाल्याच्या घरी" हे विडंबणात्मक आंदोलन..!!

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सध्या सोलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे राजरोसपणे सुरू असल्यामुळे हे अवैध धंदे बंद झाले पाहिजे.  यासाठी राज्य छावा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष योगेश पवार  यांनी पोलीस प्रशासनाला दिनांक 14 ऑगस्ट 2023 आणि 15 ऑगस्ट 2023 रोजी अवैध धंद्याच्या विरोधात दांडी यात्रा काढण्याचा इशारा दिल्यानंतर पोलीस प्रशासनाने नरमाईची भूमिका घेत शहरातील सर्व अवैध धंदे बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे चर्चा सफल आणि समाधानकारक झाल्यामुळे सोलापूर ते मुंबई जाणारी दांडी यात्रा रद्द करण्यात आल्याची माहिती पवार यांनी यावेळी दिली. पुढे बोलताना पवार म्हणाले की, या चर्चेमध्ये राजकीय दबाव पोटी शहरातील एखाद्या संघटनेच्या किंवा संस्थेच्या कार्यकर्त्यावर कोणताही अन्याय होणार नाही त्याचबरोबर कोणतीही अन्यकारक कारवाई सुद्धा होणार नाही. तसेच सामाजिक आणि राजकीय आंदोलनादरम्यान ज्या ज्या तरुणांवर गुन्हे दाखल झालेले आहेत ते सुद्धा तातडीने मागे घेण्याचे आश्वासन झोनचे पोलीस उपायुक्त कबाडे यांनी दिले. तरी राजकीय आणि सामाजिक आंदोलनादरम्यान गुन्हे दाखल झालेल्या युवकांनी पोलीस उपयुक्त कबाडे यांना भेटून गुन्ह्याची माहिती देऊन गुन्हे मागे घेण्याबाबत अर्ज द्यावेत असं आवाहन सुद्धा यावेळी पवार यांनी केले आहे. त्याचबरोबर आपण लढत असलेल्या सामाजिक लढायला सोशल मीडियातून आणि समक्ष भेटून खंबीर साथ देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा सुद्धा मी ऋणी असल्याचं यावेळी योगेश पवार यांनी सांगितलं. परंतु नंतरच्या काळात पोलीस प्रशासनाने अवैध धंद्यावर समाधानकारक कारवाई न केल्यास महाराष्ट्र सरकारच्या" शासन आपल्या दारी याच्या धर्तीवर पोलीस अवैध धंदेवाल्याच्या घरी" असे विडंबनात्मक तीव्र आंदोलन पुढील काळात संघटनेच्या माध्यमातून करण्यात येईल त्यामुळे पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन अवैध धंद्यांना पाय बंद घालावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यास आम्ही मागेपुढे पाहणार नाही.  कारण आंदोलन करणे हा संविधानाक हक्क असून तो हक्क आमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. असे सडेतोड प्रतिक्रिया यावेळी योगेश उर्फ दत्ता पवार यांनी शेवटी दिली.  झोनचे पोलीस उपायुक्त कबाडे, गुन्हे शाखेच्या सहाय्यक आयुक्त सोनवणे मॅडम आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दोरगे या अधिकाऱ्यांसमवेत चर्चा झाल्यानंतर अवैध धंद्याचा प्रश्न मार्गी लावण्याचा शब्द दिल्यामुळेच आम्ही दांडीयात्रा आंदोलन थांबवत आहोत. पोलिसांनी केलेल्या सहकार्याबद्दल सर्व पोलीस अधिकाऱ्यांना आपण संघटनेच्या वतीने धन्यवाद देतो असेही यावेळी बोलताना योगेश उर्फ दत्ता पवार यांनी नमूद केले.





No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages