पंढरपूर शहरातील रस्त्यांची दुरूस्ती व केलेल्या निकृष्ट कामांची चौकशी करा झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी पंढरपुरात कॉंग्रेस पक्षाने केले टाळ वाजवून भजनी आंदोलन
पंढरपूर(कटूसत्य वृत्त):-पंढरपूर शहरात नगरपरिषदेच्यावतीने करण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांची तात्काळ दुरूस्ती करण्यात यावी व आषाढी यात्रा कालावधीत केलेल्या रस्त्यांच्या कामांची सखोल चौकशी करून संबंधितांवर तातडीने कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी पंढरपूर शहर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमर सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर नगरपरिषदेसमोर टाळ वाजवून भजन म्हणून आंदोलन करत झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी आपल्या मागणीकडे लक्ष्य वेधण्यासाठी अनोखे आंदोलन करण्यात आले. यानंतर प्रशासनाच्यावतीने नायब तहसिलदार कोळी यांनी कॉंग्रेसचे निवेदन स्विकारले. यावेळी सुहास भाळवणकर, संदिप शिंदे, सागर कदम, पुरूषोत्तम देशमुख, मिलिंद अढवळकर, नागनाथ अधटराव, देवानंद इरकल, शिवकुमार भावलेकर, भाऊ तेलंग, संतोष हाके, मधुकर फलटणकर, सोमनाथ आरे, सुनिल उत्पात, शामराव साळुंखे, मयूर भुजंगे, महेश अधटराव, मल्हारी फाळके, प्रकाश साठे, समाधान पोळ,राहुल गवळी, किशोर जाधव, सागर पोरे, सागर लोखंडे, राज वाघमारे, नंदू आगावणे, आदित्य शेटे, सुनिल क्षिरसागर यांच्यासह कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व पंढरपूर शहरातील नागरिक उपस्थित होते. पंढरपूर शहराध्यक्ष अमर सुर्यवंशी म्हणाले की, पंढरपूर ही समतेची भूमी आहे या ठिकाणी दररोज हजारो भाविक विठ्ठल रूक्मिणीमातेच्या दर्शनासाठी येतात. येणाऱ्या भाविकांच्या व शहरातील नागरिकांच्या हितासाठी सरकारकडून कोट्यावधी रूपयांचा निधी दिला जातो पण त्या पैशातून योग्य कामे केली नसल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामांवरून येते. 1 ते 2 महिन्यातच रस्ते पुन्हा एकदा खराब झालेले असून रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न निर्माण होत आहे यामुळे पंढरपूर नगरपरिषदेचे लक्ष्य वेधण्यासाठी कॉंग्रेस कमिटीच्या वतीने टाळ वाजवून भजन म्हणत आंदोलन करण्यात आले व झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र सदरच्या आंदोलनाची दखल घेवून रस्त्यांची कामे त्वरित चांगल्या दर्जाची करण्यात यावी व आषाढी यात्रा कालावधीत रस्ते केलेल्या ठेकेदारांवर कारवाई न केल्यास यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल त्यास संपुर्णत: नगरपरिषद प्रशासन जबाबदार राहील असा इशारा ही शहराध्यक्ष अमर सुर्यवंशी दिलेला आहे.
.jpg)
No comments:
Post a Comment