आ.प्रणिती शिंदे यांची राष्ट्रीय समितीवर वर्णी..! सोलापूरात होणार विकासाची पायाभरणी..!!
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्रातून तब्बल आठ जणांना काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीवर काम करण्याची संधी मिळाली असून त्यामध्ये सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांचीही निवड झाली असल्यामुळे सोलापूरकरांच्या आणि तरुणांच्या आशा पुन्हा जिवंत झालेल्या आहेत. या आठ जणांच्या समितीत तरुण तडफदार आणि अतिशय कमी वयात या समितीवर आमदार प्रणिती शिंदे यांची वर्णी लागल्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य पसरलेले आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना यामुळे प्रेरणा मिळणार असल्याचे बोलले जात आहे. 2014 मध्ये अचानकपणे मोदी लाट आल्यानंतर काँग्रेसकडे असणारा मतदार वर्ग विशेषता तरुण वर्ग भाजपाच्या कमळाखाली विसावल्यामुळे काँग्रेसची हक्काची व्हाेट बँक ही रणरागिनी पुन्हा एकदा खेचून आणणार असल्याची चर्चा सध्या काँग्रेसच्या राजकीय वर्तुळामध्ये होताना दिसत आहे.प्रणिती शिंदे शहर मध्ये मधून सलग तीनदा विजय झाल्या असून हॅट्रिक आमदार म्हणून त्यांची ओळख संपूर्ण राज्यभर झाले असून त्या माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या असल्या तरी सुद्धा त्यांची राजकारणामध्ये एक वेगळी ओळख निर्माण झाली असून राज्यभरातील तरुणांमध्ये त्यांची आणि त्यांच्या कामाची जाई जुई च्या माध्यमातून एक वेगळी क्रेझ निर्माण झाली असल्याचे दिसून आले आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये सोलापूर जिल्ह्यातील अनेक प्रश्न त्यांनी अतिशय तळमळीने विधानसभेत मांडले त्यामध्ये त्यांनी तरुणांचे, महिलांचे, वंचित, शोषित आणि विडी आणि यंत्रमाग धारकांचे प्रश्न मांडून शासन दरबारी न्याय मागितला आहे. गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून सोलापूर शहरांमध्ये त्यांनी अनेक सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेवून आपल्या कार्याची उंची दाखवल्यामुळे शहराबरोबरच संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुद्धा आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडे विकासाला दिशा देणारी आणि सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी आपल्या हक्काची ताई म्हणजे प्रणिती ताई अशा प्रकारची आपुलकी तयार झालेली आहे. 2014 च्या मोदी लाटेत सुद्धा अनेक मातब्बर नेत्यांना पराभवाची चव चाखावी लागली परंतु आमदार प्रणिती शिंदे यांनी शहर मध्ये मधून विजय खेचून आणला. विकास काम आणि सर्वसामान्य माणसांची असणारी नाळ यामुळेच त्यांचं नाव सध्या सोलापूर लोकसभेसाठी घोषित झाल्यामुळे येणाऱ्या काळात सोलापूर लोकसभेच्या तरुण तडफदार खासदार म्हणून लोकसभेत सुद्धा आपले कर्तबदारी दाखवतील अशी चर्चा सध्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. सध्या महाविकास आघाडीमध्ये ही जागा शिवसेनेच्या शिंदे गटाने सुद्धा मागितले असून भाजपा सुद्धा या जागेवर पुन्हा एकदा नवा चेहरा कोरी पाटी असणारा उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. परंतु या सर्व उमेदवारांना भारी पडतील त्या आमदार प्रणिती शिंदे ..! पुढच्या वर्षी होऊ घातलेल्या विधानसभा आणि लोकसभेच्या रणांगणावर आमदार प्रणिती शिंदे यांना आव्हान देण्यासाठी अनेक इच्छुकांनी आता पासूनच मोर्चे बांधणीला सुरुवात केली असली तरी येणाऱ्या काळात आमदार प्रणिती शिंदे यांचेच पारडं जड असणार अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये मोठ्या प्रमाणात दिसू लागलेली आहे.
.png)
No comments:
Post a Comment