मोहोळजवळील यावली येथे भीषण अपघात; चार महिलांचा मृत्यू, सहा जखमी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 24, 2023

मोहोळजवळील यावली येथे भीषण अपघात; चार महिलांचा मृत्यू, सहा जखमी

 मोहोळजवळील यावली येथे भीषण अपघात; चार महिलांचा मृत्यू, सहा जखमी


मोहोळ (कटूसत्य वृत्त):- सोलापूरच्या दिशेने निघालेल्या इको कार ने समोरील वाहनाला धडक देऊन झालेल्या अपघातात, चौघांचा मृत्यू झाला, अन्य 6 जण जखमी झाले. हा अपघात सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मोहोळ शहरा जवळ पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास झाला.

अदमअली मुनावरअली शेख वय 37, हिराबाई रामदास पवार वय 75, कमलाबाई मारुती वेताळ वय 60, सर्व रा रांजणगाव (मशीद) ता पारनेर जिल्हा अहमदनगर हे गंभीर जखमी होऊन जागीच मयत झाले. तर द्वारकाबाई नागनाथ गायकवाड वय 40 रा रांजणगाव या उपचारासाठी सोलापुर येथील शासकीय रूग्नालयात दाखल करताना मृत झाल्या. तर बाली बापू पवार वय 27, छकुली भीमा पवार वय 27, साई योगीराज पवार वय 7, मंदाबाई नाथा पवार वय 52, सुरेखा भारत मोरे वय 45, बायजाबाई रामदास पवार वय 60 सर्व रा रांजणगाव हे जखमी झाले आहेत. सर्व जखमींना सोलापूर येथील शासकीय रुग्नालयात उपचारासाठी दाखल केले आहे. मोहोळ पोलिसां कडून मिळालेल्या माहिती नुसार, बुधवार ता 23 रोजी इको कार क्रमांक एम एच 46/ ए पी 4120 ही रांजणगाव हून देवदर्शना साठी वरील सर्व जखमी व मयत यांना घेऊन तुळजापुरला निघाली होती.कार पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास मोहोळ शिवारात आली असता, तिने पुढे जाणाऱ्या अज्ञात वाहनास पाठीमागून जोराची धडक दिली.

त्यात वरील चार जण मृत तर अन्य 6 जण जखमी झाले. मृत व जखमी हे अहमदनगर जिल्ह्यातील आहेत. या अपघाताची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना समजताच त्यांनी दूरध्वनीवरून जखमींना रुग्णालयात दाखल करण्या संदर्भात संबंधीतांना सुचना दिल्या. जखमींची विचारपुस करून त्यांना धिर दिला.

त्यामुळे जखमींचे नातेवाईक येण्या अगोदरच जखमीवर तातड़ीने उपचार सुरू झाले होते. या अपघाताची खबर मल्लिकार्जुन बळीराम बजूलगे वय 40 रा मडके वस्ती, सोलापूर यांनी मोहोळ पोलीसात दिली आहे. या घटनेचा तपास अपघात पथकाचे पोलीस उपनिरीक्षक ज्योतिबा पवार करीत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages