कायद्याने दिलेल्या संरक्षणाचा वापर करा - सपोनी. निलेश बागाव - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 10, 2023

कायद्याने दिलेल्या संरक्षणाचा वापर करा - सपोनी. निलेश बागाव

 कायद्याने दिलेल्या संरक्षणाचा वापर करा - सपोनी. निलेश बागाव

अकलूज (कटूसत्य वृत्त):- मुलींना कायद्याने भरपूर संरक्षण दिले आहे. मात्र त्याचा वापर त्यांनी केला पाहिजे. मुलींनी स्वावलंबी आणि समर्थ बनण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असे आवाहन वेळापूर पोलीस ठाण्याचे सपोनी निलेश बागाव यांनी केले. जिजामाता कन्या प्रशालेत क्रांती दिनानिमित्त आयोजित देशभक्तीपर गित गायन स्पर्धा बक्षिस समारंभा प्रसंगी ते बोलत होते.
शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित, जिजामाता कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय अकलूज येथे दि.९ ऑगस्ट २०२३ रोजी ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने राष्ट्रभक्तीपर समुहगीत गायन स्पर्धेचे आयोजन करुन शहीद हुतात्म्यांना संगितमय श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
जिजामाता कन्या प्रशाला अकलूज आपल्या उपक्रमशील अध्ययन प्रक्रियेसाठी प्रसिद्ध आहे.९ ऑगस्ट "क्रांती दिना"च्या औचित्यावर विद्यार्थ्यिनींचे चार गट केले होते. त्यांस विख्यात गायिका श्रेया घोषाल, सुनिधी चौहान, नीती मोहन आणि नेहा कक्कड अशी नावे दिली होती. या गटवार स्पर्धेत विद्यार्थिनींनी हे राष्ट्र देवतांचे, हा देश माझा याचे भान जरासे राहू द्यारे, चला उठा रे नवयुवकांनो, छोडो कल की बाते कल की बात पुरानी, संदेसे आते है, वंदे मातरम आणि ओ देश मेरे...अशी एकापेक्षा एक अत्यंत बहारदार समूहगीते सादर केली. या स्पर्धेचे परीक्षण सुप्रसिद्ध किङणी रोग तज्ञ डॉ. श्रीकांत देवडीकर व विख्यात गायिका स्नेहा शिंदे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक प्रशाला व्यवस्थापन समितीच्या सदस्या नयना शहा या होत्या. याप्रसंगी मुख्याध्यापिका सुनिता वाघ, अकलूज केंद्र शाळेचे प्रमुख श्री जाधव सर, नरूळे मॅडम आणि मोठ्या संख्येने पालकवर्ग उपस्थित होता.
मराठी गीतांमध्ये नीती मोहन गटाने सादर केलेल्या चला उठा रे नवयुवकांनो या गाण्याचा प्रथम क्रमांक आला तर हिंदी गीतांमध्ये श्रेया घोषाल गटाच्या वंदे मातरम गीता प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले दिग्विजय जाधव सर यांनी स्पर्धेचा निकाल घोषित केला.
याप्रसंगी विजय गणेशोत्सव मंडळ अकलूज यांचेवतीने आयोजित समूहनृत्य स्पर्धेत यश मिळवल्याबद्दल प्रशालेच्या शिक्षिका सौ राजश्री कणबुर मॅडम यांचाही सत्कार प्रशस्तीपत्र देऊन करण्यात आला. प्रशालेच्या बाल वाद्य वृंदाच्या विद्यार्थिनींनी संगीतशिक्षक श्री ज्ञानेश्वर शेलार सरांच्या नेतृत्वाखाली अत्यंत सुरेख संगीतसाथ दिली. त्यांचाही याप्रसंगी सत्कार करण्यात आला. स्नेहा शिंदे व डॉ . देवडीकर यांनी सादर केलेल्या गीतगायनामुळे सर्व विद्यार्थिंनीनी एकच जल्लोष केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक वाय.के. माने देशमुख सर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रवीण गोडसे सर यांनी केले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन रोहित माने सर आणि प्रल्हाद भोसले सर यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages