क्रांती दिनी फिनिक्स इंग्लिश स्कूलमध्ये महापुरुषांची वेशभूषा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 10, 2023

क्रांती दिनी फिनिक्स इंग्लिश स्कूलमध्ये महापुरुषांची वेशभूषा

 क्रांती दिनी फिनिक्स इंग्लिश स्कूलमध्ये  महापुरुषांची वेशभूषा

अकलूज (कटूसत्य वृत्त):- माळशिरस तालुक्यातील लवंग २५/४ येथील फिनिक्स इंग्लिश स्कूल येथे ९ ऑगस्ट क्रांतीदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी शाळेतील चिमुकल्या मुलांनी विविध महापुरुषांच्या वेशभूषा करून आले होते.त्यामुळे आजचा दिवस मुलांनी आगळावेगळा साजरा केला.
        महामानवांच्या वेशभूषेचे अनुक्ररण करून फिनिक्स इंग्लिश स्कूलच्या बालकांनी गावातून रॅली काढून भारत माता की जय,वंन्दे मातरम अशा घोषणा देत क्रांतिदिवस साजरा केला.या वेळी बालकांनी वेगवेगळ्या महामानवांच्या वेशभूषा भारत माता, महात्मा गांधी,डॉ.बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू,सावित्रीबाई फुले,लाल बहाद्दूर शास्त्री छत्रपती शिवाजी महाराज,राजमाता जिजाऊ,झाशीची राणी लक्ष्मीबाई,टिपू सुलतान,भगतसिग,इंदिरा गांधी, डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांची वेशभूषा साकारून क्रांती दिन साजरा केला.
      या वेळी रस्त्याने ये जा करणारे नागरिक या मुलांच्या रॅलीकडे कुतूहलाने पहात होते.या रॅलीमध्ये पोलीस हवालदार कुंभार,पो.कॉ.तांबोळी,पो.कॉ. पवार यांनाही या देशभक्त बालकांकडे पाहून कौतुक केले. आपली गाडी थांबवुन या विध्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून विद्यार्थ्यांमध्ये मिक्स होऊन जय हिंद भारत माता की जय म्हणत विद्यार्थ्यांसोबत सेल्फी काढून आपले देशभक्तांविषयीचे  प्रेम व्यक्त केले .
          या प्रसंगी फिनिक्स स्कूलच्या संचालिका सौ. नुरजहाँ फकृद्दीन शेख म्हणाल्या की,बालकांच्या सर्वांगीण विकासा  बरोबर वेगवेगळे उपक्रम राबवत त्यांच्यात देशभक्तीची बीजे बालमनात रुजवली गेली तरच आजचा बालक उद्याचा उत्तम नागरिक होणार आहे.
        या प्रसंगी ब्राह्मचैतन्य इंग्लिश स्कूल तांदूळवाडीचे संस्थापक संजय मोहिते, समाधान जगताप,गुलशन शेख  पालक संघाचे अध्यक्ष रेवन भोळे,उपाध्यक्ष रामचंद्र चव्हाण व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.शेवटी शंकर (अण्णा) पराडे व सोमनाथ राऊत यांनी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages