शहर मध्य च्या आमदार प्रणिती शिंदे यांनी सुखी नगर येथील
नागरिकांच्या जाणून घेतल्या समस्या ''
समाजसेविका रणरागिनी विद्या मानेयांच्या प्रयत्नाला यश..!?
सोलापूर (कटू सत्य वृत्त) : - शहर मध्य च्या आमदार प्रणिती शिंदे सध्या ॲक्टिव्ह मूडमध्ये असून भावी खासदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. त्यामुळे ते सध्या शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपला वेळ देत असल्याचे दिसत आहे. समाजसेविका विद्यमाने यांनी सुखी नगर भागातील समस्या त्यांच्या कानावर घातल्या. त्यानंतर त्यांनी तात्काळ या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाणी केली. निवडणुकीच्या काळातच फक्त जनतेची कामे करून मतासाठी नवनवीन आमिष दाखविणारे लोकप्रतिनिधी सोलापूर शहरात आणि जिल्ह्यात पायली ला 50 आहेत . परंतु निवडणुका असो अथवा नसो जनतेबरोबर असलेली नाळ कायमचीच अखंड ठेवून कायमस्वरूपी जनतेच्या कामांमध्ये वाहून घेतलेल्या शहर मध्ये च्या आमदार प्रणिती शिंदे आपल्या मतदारसंघासाठी कायमस्वरूपी वेळ देत असून रात्रीच्या अंधारात सुद्धा त्यांनी प्रभाग क्रमांक 23 येथील ड्रेनेज लाईन आणि पाण्याची पाईपलाईन रस्ते यामुळे होणारी नागरिकांची अडचण स्वतः पाहणी करून या सर्व परिसर सुखी नगराप्रमाणे सुखी संपन्न करण्याचा आश्वासन दिल्यामुळे येथील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
या भागातील समाजसेविका विद्याताई माने यांनी आमदार प्रणिती शिंदे यांना या संदर्भात निवेदन दिले तसेच या प्रभागाच्या नगरसेविका सुनिता रोटे यांनीही ही समस्या आयुक्त शितल तेली उगले यांच्या कानावर घातली त्यामुळे या समस्या सुटण्यास मदत होणार असल्यामुळे नागरिकांनी आनंद व्यक्त केलेला आहे.
0 Comments