शहर युवक काँग्रेसचा महानगरपालिकेवर 'हलगीनाद* मोर्चा..!
दक्षिण सोलापुरातून कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष..!!
सोलापूर (कटू सत्य वृत्त) : -सोलापूर शहरातील नागरिकांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने महापालिकेवर हलग्यांच्या कडकडाटात हलगीनाद मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या विशेष निमंत्रित सदस्य तथा प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांनी केले.
आमदार प्रणिती ताई शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी दक्षिण सोलापूर तालुक्याचे विधानसभा अध्यक्ष महेश जोकारे यांनी शेकडो गाड्यांचा ताफा मोर्चामध्ये सहभागी केला. आणि मोठे शक्ती प्रदर्शन केले. या मोर्चामध्ये शहरातील आणि जिल्ह्यातील
, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, उपाध्यक्ष शिवराज मोरे, प्रदेश प्रवक्ते दीपक राठोड, सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे* यांची प्रमुख उपस्थिती होती. सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने नागरी समस्या सोडविण्यासाठी अपयशी ठरलेल्या भाजप सरकार आणि सोलापुर महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात चार पुतळा येथून सोलापूर महापालिकेवर हलगीनाद जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी दक्षिण विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश जोकारे यांनी आ. प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वात आणि शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या सूचनेप्रमाणे पुढाकार घेत, दक्षिण सोलापूर विधानसभेमधील शेकडो दुचाकी गाड्या आणि कार्यकर्त्यांसह या मोर्चामध्ये उत्स्फुर्त सहभाग नोंदवला. यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक उपाध्यक्ष शरण पाटील, जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील, माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, नगरसेवक बाबा मिस्त्री, जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष सुरेश हसापुरे, तालुका अध्यक्ष हरीश पाटील, विनोद भोसले, अंबादास करगुळे व इतर नेते मंडळींचा त्यांना मार्गदर्शन लाभले.
या व्यतिरिक्त कुमठे, सैफुल आणि भारती विद्यापीठ,नेहरू नगर या दक्षिण सोलापूर विधानसभेतील प्रमुख वार्डामध्ये प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वात आणि कुणाल राऊत, शिवराज मोरे यांच्या हस्ते 'माझा प्रभाग, माझी शाखा' च्या माध्यमातून महेश जोकारे यांनी युवक काँग्रेसच्या शाखांचे उद्घाटन देखील केले.
यावेळी सोलापूर युवक काँग्रेसचे अध्यक्ष तथा मोर्चाचे संयोजक गणेश डोंगरे, मध्य विधानसभा युवक काँग्रेसचे वाहिद बिजापुरे,उत्तर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश लोंढे, प्रवक्ते अशोक निंबर्गी, महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, प्रदेश सरचिटणीस श्रीकांत वाडेकर, अनंत म्हेत्रे, प्रवीण जाधव, जितू गावडे, श्रीधर नंदर्गी, विश्वनाथ कोळी, सचिन स्वामी, महासिद्ध कुंभार, शरद पाटील, राजासाब शेख, जीवक इंगळे, समीर काझी, अमोल माशाळे, प्रशांत शेळगी, ओंकार कोले, अमोग व्हणमाने, धीरज खंदारे, रोहन साठे, सुनील सारंगी, सुभाष वाघमारे व बहुसंख्य युवकांची उपस्थिती होती.
0 Comments