आयसीटीसी प्रशिक्षण घेतलेल्या जिल्ह्यातील ५० उत्कृष्ठ शिक्षकांचा गौरव
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आयसीटीसी प्रशिक्षण घेतलेल्या जिल्ह्यातील ५० उत्कृष्ठ शिक्षकांचा गौरव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांचे हस्ते करणेत आला.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात या कार्सक्रमाचे आयोजन करणेत आले होते.जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वेळापूर जि. सोलापूर, प्राथमिक शिक्षण विभाग जि.प.सोलापूर, अॅमेझॉन प्युचर इंजिनिअर आणि लीडरशिप फॉर इक्विटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या कॉम्पुटर सायन्स टिचींग एक्सलन्स उपक्रम मध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील ५० शिक्षकांना सिईओ मनिषा आव्हाळे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी डाएट प्राचार्य डॉ. इब्राहिम नदाफ, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले, एलएफइ संस्थेचे तुकाराम लाळगे प्रमुख उपस्थित होते. कॉम्पुटर सायन्स टीचींग एक्सलन्स उपक्रम हा महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यामध्ये राबविला गेला. कॉम्पुटेशनल थींकिंग आणि कोडिंग च्या माध्यमातून शिक्षकांना २१ व्या शतकातील कौशल्यांची आणि कोडींगची ओळख करून देणे हा हेतू होता. या उपक्रमामुळे स्थानिक स्वराज संस्थेच्या शाळेतील शिक्षकांना संगणक विज्ञानातील नवीन संकल्पना शिकण्याची संधी मिळाली. मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी आयसीटीसी प्रशिक्षणात उत्कृष्ट कामगिरी करून पारितोषिक प्राप्त केल्याबद्दल उपस्थित सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले. आठ कॉम्पुटर असलेली लॅब, स्मार्ट टीवी, बॅगसह लॅपटॉप, कव्हरसह टॅबलेट आणि सीएस कीट असे डिजिटल संसाधने पारितोषिक स्वरुपात देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाएट अधिव्याख्याता शशिकांत शिंदे यांनी केले तर सूत्रसंचालन आणि आभार जि.प. शिक्षक संभाजी पवार यांनी केले.
0 Comments