Hot Posts

6/recent/ticker-posts

जीवाला जीव देणारा सखा हरपला..!

 जीवाला जीव देणारा सखा हरपला..!

माणसाचं जीवन हे क्षणभंगुर आहे. माणसाचं हे आयुष्य म्हणजे पाण्याचा बुडबुड आहे असं आपण अनेकदा ऐकतो. अगदी त्याचप्रमाणे कायमस्वरूपी जीवनाच्या प्रत्येक वळणावर  माझ्या मित्राची आठवण येत राहील. तू माझा मित्र आमच्या तू आज पासून दिसणार नाही. खरंच निसर्गाचा नियम कुणालाच मोडता येत नाही. परंतु निसर्ग हा अशा निरागस आणि प्रेमळ माणसांनाच प्रथम का का बरे प्राधान्य देत असेल हे मात्र न उघडणार कोड आहे. माझा मित्र अभिजीत जीवनाच्या प्रत्येक कसोटीत जिंकला परंतु आज मात्र काळा काळापुढे त्याला हार मानावी लागली. शेवटी काळ कुणालाही सोडत नाही हेच सत्य कटू असलं तरी सत्य आहे.

                      जीवनात आल्यापासून,देव चांगल्या माणसांनाच का वेचतो हा मनाला पडलेला कायमचा प्रश्न.उत्तर आजपर्यंत मिळालेलं नाही आणि ते कधीच मिळणार ही नाही हा सृष्टीने सांगून ठेवलेला नियमच असावा.त्यामुळे आज अभिजित भाऊ गेल्याची दु:खद बातमी ऐकली आणि अश्या अनपेक्षित घटनेतून निर्माण होणारा प्रश्न पुन्हा मनाला सुन्न करून गेला.प्रमोद बापु ने या दु:खद घटनेची खबर फोन करून कळवली आणि दोन मिनिटे पायाखालची जमीन सरकल्याचा अनुभव आला बापु ती घटना फोन  वर सांगत होते तस तसे माझ्या नजरेसमोर  अभिजित भाऊचा तो हसरा, तेजस्वी चेहरा तरळत होता.पण त्यांचा हसरा चेहरा पाहून माझ्या चेहऱ्यावर हसू उमटायचे सोडून डोळ्यात अश्रूंची गर्दी झाली होती.कारण आता अभिजित भाऊचा जो काही सहवास होता तो संपला होता. आमची घट्ट झालेली मैत्री आज नियतीने सैलचं केली नाही तर पार त्यात ताटातूट आणली.आणि ती ताटातूट घडवून आणताना आमच्यातून आमचा जिवलग मित्र हिरावून घेतला.जसा रामायणात भरताला सोडून राम वनवासात गेला होता तसाच हा राम  (अभिजित )त्याच्या असंख्य भरताला सोडून देवापाशी गेला.पण खूपच वाईट या गोष्टीचे वाटते की देव अश्या गोड लोकांना समाजात का ठेवत नाही.समाजात घडणाऱ्या वाईट घटना, माणसांत असलेला बेतालपणा, वाईट प्रवृत्तीच्या लोकांना आदर्श घालून देण्यासाठी अशी गोड, प्रामाणिक,प्रेमळ,स्वभावी माणसं समाजात असायला हवीत ना.पण काय करणार सृष्टीच्या नियमा पुढे मानवाला हारचं मानावी लागते.आणि मग अश्याच हरलेल्या मनाने अभिजित भाऊ आता आपल्यात नसल्याची बातमी जड अंतःकरणाने स्विकारली.
नागनाथ महाराज चे निस्सिम भक्त,विठ्ठल दिंडी सोहळ्यातील धडपडी  व्यक्तीमत्व,, सच्चा मित्र, जबाबदार कर्ता पुरुष, आणि आपल्या गोड स्वभावाने समोरच्याला जिंकणारा गोड माणूस.असे हे बहुगुणी ,
         मित्रांच्या गराड्यात सतत वावरणारा, त्यांच्या सोबत भटकंती करायला,पांडुरंगाची वारी करायला,आध्यात्मिक कार्यक्रमात सहभाग द्यायला आभिजित कायमचं आघाडीवर असायचे.त्यांचा हाच सहभाग त्यांनी जोडलेल्या प्रियजणांना आता इथून पुढे त्यांच्या स्वरुपात लाभायचा नाही.शिवाय प्रसंगानुसार त्यांच्या आठवणी येत राहतील.कारण ते एकत्र व्यतीत केलेल्या क्षणाचे पुरावे असतील. अश्या गोड, प्रेमळ अभिजित बरोबरचा शेवटचा फोटो येथे आवरजुन शेर करतोय आभिजित भाऊच्या आत्म्यास शांती लाभो हिच नागनाथ महाराज चरणी प्रार्थना..!!!

Reactions

Post a Comment

0 Comments