माढ्यातील दीपक जगताप यांची सिंगापुर येथील परिषदेसाठी रवाना - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 22, 2023

माढ्यातील दीपक जगताप यांची सिंगापुर येथील परिषदेसाठी रवाना

 माढ्यातील दीपक जगताप यांची सिंगापुर येथील परिषदेसाठी रवाना 


माढा (कटूसत्य वृत्त):- माढ्यातील प्रसिध्द  विमा प्रतिनिधी दिपक जगताप हे सिंगापूर येथे दिनांक २७ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट दरम्यान होत असलेल्या आंतरराष्ट्रीय ग्लोबल विमा परिषदमध्ये भारतीय आयुर्विमा महामंडळकडून भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. जगताप हे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव कार्पोरेट कल्ब मेंबर आहेत. त्यांनी आतापर्यंत विमा व्यवसायातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील एमडीआरटी (युएसए)हा बहुमान सलग २१ वेळा मिळवून ते गेली चार वर्ष आंतरराष्ट्रीय स्तरावरील एकाच वर्षात तीन एमडीआरटी कोर्ट आॅफ टेबल अमेरिकाचे ते सदस्यही आहेत.
या निवडीबद्दल त्यांचे सर्वच स्तरांतून अभिनंदन होत आहे. पूणे विभाग दोनचे वरिष्ठ क्षेत्रीय व्यवस्थापक संदीप गोखे, मार्केटिंग मॅनेंजर सुयश तेलंग, सेल्स मॅनेंजर संतोष पालकर, सोलापूरचे. वरिष्ठ शाखा प्रबंधक संजय खत्री, उपशाखाधिकारी अमोल मगरे व मोहन कदम यांनी  अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages