माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नामुळेजेऊर, माढा, केम येथे रेल्वे गाड्यांना थांबा,प्रवाशांची होणार सोय ..व्यापारी वर्ग ही आनंदला
माढ (कटूसत्य वृत्त):-माढ्याचे भाजपाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नातून मध्य रेल्वेच्या माढा, जेऊर व केम या रेल्वेस्थानकावर तीन एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांना थांबा मिळाला आहे.याचे अधिकृत पत्र रेल्वे खात्याच्या वतीने प्रसिद्ध झाले आहे.जेऊर येथे कोणार्क एक्सप्रेस, केम येथे कन्याकुमारी एक्सप्रेस, व माढा येथे सिद्धेश्वर एक्सप्रेस गाडीला थांबा मिळाल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.व्यापारी वर्गातुन या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह प्रवाशांनी माढ्यात सिद्धेश्वर एक्स्प्रेस ला थांबा देण्याची मागणी खासदार निंबाळकर यांच्याकडे केली होती.मुंबईला सिद्धेश्वर एक्स्प्रेस जायचे असल्यास माढा शहरातील व परिसरातील नागरींकाना कुर्डूवाडी जंक्शनवर जावे लागत असायचे.आता माढा रेल्वे स्टेशन वर सिद्धेश्वर एक्स्प्रेस थांबण्याचा निर्णय झाल्याने प्रवाशामधुन समाधान व्यक्त होत असुन खासदार निंबाळकर यांनी प्रवाशांच्या मागणीचा विचार करुन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे खासदार निंबाळकर यांनी पाठपुरावा केल्याने या रेल्वे एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळाला आहे.
.jpg)
No comments:
Post a Comment