श्रध्द संकूल येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा। - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 22, 2023

श्रध्द संकूल येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा।

 श्रध्द संकूल येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा।

सोलापूर  (कटूसत्य वृत्त):-श्रध्दा इंग्लिश मिडीयम स्कूल व श्रध्दा विद्यामंदिर मोहोळ येथील स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे शिवाजी मोटे (कै.शं.बा.पाटील माध्य.व उच्च माध्य.विद्यालय अनगर - माजी पर्यवेक्षक).विद्याधर गव्हाणे ( जेष्ठ साहित्यिक - महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त पर्यावरण मित्र ) संस्थेचे सचिव  सुनिल झाडे, नूतन पोलीस उपनिरीक्षक झहीर शेख, पालक प्रतिनिधी सिद्धेश्वर थोरात,मोहित झाडे,.सुनिल लोहार यांची उपस्थिती होती.

                   या कार्यक्रमाप्रसंगी विविध देशभक्तीपर गीते,देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आशा थोर हुतात्मांविषयी विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून माहिती दिली.आय.टी.एस.विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. मार्गदर्शक शिक्षकांचा भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व जागतिक तापमानवाढ याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहशिक्षिका माधुरी पाटील,सूत्रसंचालन प्रा.अमित सुरवसे,आभारप्रदर्शन पल्लवी गोडसे यांनी केले.

कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळा व्यवस्थापिका धरती पाटील, दोन्ही प्रशालेचे मुख्याध्यापक वीणा कदम,दिनेश नरळे सांस्कृतिक विभाग प्रमुख विद्या पवार व सविता पाटोळे तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे  मोलाचे योगदान मिळाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages