स्वातंत्र्य दिनानिमित्त आपने काढले सोलापुरात भव्य तिरंगा रॅली..!
सोलापूर(कटुसत्य वृत्त):- 15 ऑगस्ट रोजी आम आदमी पार्टी सोलापूर तर्फे "ध्वजवंदना आणि तिरंगा यात्रा" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आम आदमी पार्टी चे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, आणि शुभचिंतकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. सकाळी ठीक 9.00 वाजता ध्वजवंदना करून तिरंगा रॅलीची सुरवात करण्यात आली. कुमठा नाका चौक पासून ते 70 फूट रोड भाजी मार्केट पर्यंत रॅली काढण्यात आली. त्यानंतर हुडको नंबर 3 येथील एकविरा स्पोर्ट्स समोर समारोप करण्यात आला. यासोबतच मोफत दंत तपासणी शिबिराचे ही आयोजन करण्यात आले होते. परिसरातील जवळपास 300 नागरिकांनी या शिबिराचे लाभ घेतले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
.jpg)
No comments:
Post a Comment