लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयात माझी माती माझ्या देश अभियान
सोलापूर (कटुसत्य वृत्त ):-श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत केंद्रशासानाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवनिमित्त राबविण्यात येणाऱ्या "माझी माती माझा देश" या अभियानांतर्गत पंचप्रण शपथ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये विद्यार्थ्यांनी २०४७ पर्यंत भारतास आत्मनिर्भर, विकसित व बलशाली राष्ट्र बनविण्यासाठी तसेच देशाच्या सार्वभौम विकासासाठी देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करण्याची पंचप्रण शपथ घेतली. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अमोल शिंदे हे अध्यक्षस्थानी होते. त्यांनी विद्यार्थ्यांना या पंचप्रण शपथेच्या मार्गदर्शक तत्वांविषयी मार्गदर्शन केले. प्रा. महाजन एस आर.,प्रा. आदलिंगे पी. एम.,प्रा. सरकाळे ए. पी., राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. एन. एस. खुने,प्रा. उंबरे पी. एच.,वरिष्ठ लिपिक डोईजोडे एस. एस. तसेच महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment