नात्याला कलंक लावणाऱ्या माढ्यात घडलेल्या हल्याच्या निषेधार्थ,माढ्यात मुली महिला सह नागरिकांचा मूक मोर्चा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 16, 2023

नात्याला कलंक लावणाऱ्या माढ्यात घडलेल्या हल्याच्या निषेधार्थ,माढ्यात मुली महिला सह नागरिकांचा मूक मोर्चा

 नात्याला कलंक लावणाऱ्या माढ्यात घडलेल्या हल्याच्या निषेधार्थ,माढ्यात मुली महिला सह नागरिकांचा मूक मोर्चा 


माढा  (कटुसत्य वृत्त):-  माढा शहरातील व्यापारी महेंद्र शहा यांच्या वर सहा जणांनी केलेल्या प्राणघातक हल्याच्या घटनेच्या निषेधार्थ माढा शहरात नगराध्यक्षा अॅड. मिनल साठे यांच्या नेतृत्वाखाली महिला मुलीसह नागरींकानी एकत्रित येऊन मुक मोर्चा काढला.
जन्मदात्या वडिलांनाच मारण्याची सुपारी मुलीने देऊन प्राणघातक हल्ला साक्षी शहा हिने कट रचुन केला होता.या घटनेचा निषेध नोंदवुन सहा मारेकऱ्यांना कडक शिक्षा करण्याच्या मागणीसाठी माढ्यातुन मुक मोर्चा काढण्यात आला. सोमवारी सकाळी ९.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातुन मोर्चाला सुरुवात झाली.इंदिरा गांधी चौक,शुक्रवार पेठ,शिवलाल वाचनालय चौक मार्गे;कसबा पेठ मार्गे,सराफ पेठेतुन माढा तहसील कार्यालयावर धडकला.
मुक मोर्चात शालेय महाविद्यालयीन विद्यार्थिनीसह महीला नागरीक उत्स्फुर्तपणे सहभागी झाले होते.माढा तहसिल प्रशासनासह पोलिस प्रशासनाला नगराध्यक्षा अॅड.मिनल साठे यांच्या नेतृत्वाखाली महिलांच्या उपस्थितीत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, माढ्यातील व्यापारी महेंद्र शहा यांचेवर ७ ऑगस्ट रोजी माढा शेटफळ मार्गावरील वडाचीवाडी गावानजीक चार मारेकऱ्यांनी प्राणघातक हल्ला करुन शहा यांना गंभीर जखमी केले आहे.अत्यंत भयानक असा या हल्याच्या घटनेने बाप लेकीच्या नात्याला व माणुसकीला काळिमा फासला आहे.या दुष्कृत्याचा आम्ही माढा वासिय निषेध करीत आहोत.हा निषेध कोणत्याही जाती धर्माचा व्यक्तिचा नसुन चुकीच्या वृत्तीचा आहे.अश्या चुकीच्या घटनेचे अनुकरण युवा पिढीने करुन पोलिस प्रशासनाने संबधित आरोपींवर कडक शिक्षा मिळण्या कामी प्रयत्न करावेत.यावेळी उपनगराध्यक्षा कल्पना जगदाळे यांचेसह नगरसेवक नगरसेविकासह सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सदस्य महिला मुली बहुसंख्येने सहभागी झाले होते

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages