केंद्र व राज्य सरकारला सुबुद्धी दे - युवक प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 22, 2023

केंद्र व राज्य सरकारला सुबुद्धी दे - युवक प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत

 केंद्र व राज्य सरकारला सुबुद्धी दे - युवक प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत  शिराळ (टे) गावातील शनि देवाला घातला अभिषेक 

माढा (कटूसत्य वृत्त):- केंद्र व राज्य सरकार ने केलेली महागाई कमी करण्याची सुबुद्धी द्यावी यासाठी माढा तालुक्यातील शिराळ(टे) गावातील शनि देवाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी शेकडो कार्यकर्त्यांसमवेत अभिषेक घालुन प्रार्थना केली.पश्चिम महाराष्ट्राच्या  दौरा दरम्यान सोलापूर जिल्हात आलेले  युवक काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी जिल्हातील युवक काँग्रेस च्या कार्यकत्याॅसमवेत शनि देवाला  घालुन महागाई व शेतकरी विरोधी धोरणाबाबत सत्ताधारी केंद्र व राज्य सरकारला सद्बुद्धी दे असे साकडे घालून अभिषेक घातला.यावेळी युवक प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे,  महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी उदय भानू चीब, एहसान खान, प्रदेश सचिव समाधान लटके, प्रदेश सचिव अनिकेत आरकडे,सोलापूर जिल्हा युवक उपाध्यक्ष निलेश गायकवाड,मोहोळ विधानसभा तालुका अध्यक्ष चेतन पाटील, उपाध्यक्ष शाहूराज जगताप,प्रदेश महासचिव श्रीनिवास नालमवार यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages