आठ दिवसात पंचनामे करून 25% अग्रीम विमा रक्कम न मिळाल्यास रास्ता रोको करणार- सूर्यकांत चिकणे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 22, 2023

आठ दिवसात पंचनामे करून 25% अग्रीम विमा रक्कम न मिळाल्यास रास्ता रोको करणार- सूर्यकांत चिकणे

 आठ दिवसात पंचनामे करून 25% अग्रीम विमा रक्कम न मिळाल्यास रास्ता रोको करणार- सूर्यकांत चिकणे 


      

बार्शी (कटूसत्य वृत्त):- बार्शी तालुक्यातील पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना 25%अग्रीम विमा तात्काळ मंजूर करावा अन्यथा रास्ता रोको आंदोलन करणार असा इशारा भैरवनाथ शेतमजूर संघटनेचे अध्यक्ष सूर्यकांत चिकणे यांनी दिला आहे. बार्शी तालुक्यात सलग 21 दिवसा पेक्षा जास्त दिवस झालेत पाऊस पडला नाही म्हणुन व पिक विमा कंपनीच्या नियमानुसार पाऊस पडलेला नाही तरी या नियमानुसार तरी महसूल, कृषी, विमा कंपनी यांनी संयुक्त पंचनामे शेतकऱ्यांच्या बांधावर जावुन करावे व आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर 25% अग्रीम विमा रक्कम तात्काळ जमा करावी अन्यथा गुळपोळीतील एस टी स्टॅन्डवर बार्शी मोहोळ रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे असे निवेदन तहसीलदार यांना सूर्यकांत चिकणे यांनी दिले आहे सदर निवेदनावर सूर्यकांत चिकणे,शहाजी चिकणे, अतुल चिकणे, तुकाराम चिकणे, विनायक चिकणे, रेखा चिकणे, नागेश बारवकर, रामचंद्र चिकणे यांच्या सह्या आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages