ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन चा मेळावा उत्साहात ...! दाखले न मिळाल्यास उतरणार रस्त्यावर ...!! राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांचा प्रशासनाला इशारा...!! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 22, 2023

ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन चा मेळावा उत्साहात ...! दाखले न मिळाल्यास उतरणार रस्त्यावर ...!! राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांचा प्रशासनाला इशारा...!!

 ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन चा मेळावा उत्साहात ...!दाखले न मिळाल्यास उतरणार रस्त्यावर ...!! राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांचा प्रशासनाला इशारा...!!


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सध्या प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी संगणमताने भ्रष्टाचाराला पाठीशी घालत असल्यामुळे चिरीमिरी घेतल्याशिवाय कोणताही कागद पुढे सरकत नसल्यामुळेच आम्हाला दाखले मिळण्यासाठी अडचणी येत आहेत. शासनाने याकडे त्वरित लक्ष न दिल्यास आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा यावेळी ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अहमद अन्सारी यांनी  श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे. श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत पुढे बोलताना अन्सारी म्हणाले की, " सध्याच्या काळात मंडळ आयोगाच्या शिफारशीनुसार आम्हाला जात वर्गवारीचा दाखला मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी येत असून जात पडताळणी समिती आर्थिक मागणी होत आहे तसेच वक्त बोर्डाच्या कारभाराबाबत व जमिनीवर अतिक्रमणाबाबत या मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात राजमहल इम्पेरियल गार्डन उजनी ऑफिस जवळ झालेल्या भव्य मेळाव्यात या प्रश्नाला वाचा फोडण्यात आली. आजपर्यंत वैधता प्रमाणपत्रासाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता करून सुद्धा अधिकारी चिरीमिरी घेतल्याशिवाय कोणताच दाखला देत नाही त्यामुळे आम्हाला या विरोधात रस्त्यावर उतरावे लागणार असून आम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही आता थांबणार नाही असा इशाराही यावेळी ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन च्या वतीने देण्यात आला आहे. काहीच त्रुटी नसताना सुद्धा विभागीय अधिकारी जाणून-बोजून मलिदा खाण्यासाठी अडचणी दाखवून आमच्या दाखल्यांची अडवणूक करत आहेत त्यामुळे मिळणाऱ्या योजना सुद्धा आमच्यापर्यंत पोचलेला नाहीत. सध्या देशात भ्रष्टाचार शिष्टाचार बनू लागल्यामुळेच या विरुद्ध आवाज उठवणे काळाची गरज असल्यामुळे सर्व ओबीसी बांधवांना  अधिकाऱ्यांनी एक पैशाची अपेक्षा न करता दाखले देणे गरजेचे आहे. तरीसुद्धा हे अधिकारी जाणून-बुजून चिरीमिरी घेतल्याशिवाय एकही काम करत नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी कुणाकडे न्याय मागायचा..? मी भ्रष्टाचाराची साखळी मोठ्या प्रमाणात वाढू लागल्यामुळे जवळपास एक वर्षापासून अनेक प्रकरण प्रलंबित असून जवळपास दीडशे दाखले पैशासाठी चिरीमिरी साठी प्रलंबित ठेवल्याचंही यावेळी मुस्सा  मृषद यांनी सांगितले. जात पडताळणी समिती तील सर्व कर्मचारी अधिकारी यांच्या टेबलाखालून हात ओला केल्याशिवाय कोणत्याही सर्वसामान्य नागरिकाचे काम होत नसल्याची अनेक प्रकरण उजेडात आले असली तरी सुद्धा या अधिकारांवर कोणतीही कारवाई होत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. गेल्या 35 ते 40 वर्षापासून आपण सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी लढा देत असून आजपर्यंत 57 शासन आदेश आपण पाहिले असून अनेक वेळा या संदर्भात आवाज उठवल्यामुळेच आम्हाला न्याय मिळत गेला . भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याऐवजी यांचा परदास पास झाला पाहिजे असंही यावेळी अन्सारी यांनी सांगितले .मुस्लिम समाज 76 वर्गवारी मध्ये विभागला असल्यामुळे त्याला मंडळ आयोगाच्या शिफारशीनुसार न्याय मिळाला पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी असल्याचे  अध्यक्ष शब्बीरअन्सारी यांनी शेवटी  बोलताना सांगितले. या पत्रकार परिषदेला  राज्याध्यक्ष मुस्सा मुर्षद ,सोलापूर जिल्हा अध्यक्ष सलीम भाई नदाफ, शहराध्यक्ष आयुब कुरेशी,  प्रदेश सचिव इसाक खडखे, गुफ्रान अन्सारी  अश्फाक शिलेदार   आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages