टेनिक्वाइट त्यासाठी ग्रामीण भागातून जास्तीत जास्त विद्यार्थी गेले पाहिजे : डॉ. व्यवहारे
कुरुल (कटूसत्य वृत्त):- शारीरिकदृष्ट्यातून दुरुस्त राहण्यासाठी मैदानी खेळाची अत्यंत आवश्यकता आहे. मात्र दिवसेंदिवस हे खेळ कमी होताना दिसत आहेत. त्यामुळे युवकांची मानसिक संतुलन बिघडले जात आहे. यावर उपाय म्हणून मैदानी खेळाकडे लक्ष दिले पाहिजे असे सांगून टेनिक्वाइट या खेळासाठी विजयराज डोंगरे हे जिल्हाध्यक्ष या नात्याने जिल्ह्यातील खेळाडूंना प्रेरणा आणि प्रोत्साहन देतील मात्र ग्रामीण भागातील शाळांमधून या खेळासाठी जास्तीत जास्त विद्यार्थी उतरले पाहिजे असे मत डॉ. अमित व्यवहारे यांनी व्यक्त केले आहे.
शेटफळ (ता. मोहोळ) माध्यमिक विद्यालय येथे टेनिक्वाइट या खेळाच्या प्रशिक्षण शिबिराची सुरुवात झाली. हा खेळ ग्रामीण भागात वाढवण्यासाठी या खेळाचा ग्रामीण भागात प्रसार करण्यासाठी क्रीडाप्रेमी जिल्हाध्यक्ष विजयराज डोंगरे यांनी खेळाच्या प्रशिक्षण शिबिर शेटफळ येथून संपूर्ण जिल्हाभरात सुरुवात केली. यावेळी अमित व्यवहारे बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख वैभव मोरे, तालीम संघाचे जिल्हा उपाध्यक्ष सर्जेराव चवरे, उपसरपंच दत्तात्रेय वागज, युवा नेते विश्वजीत डोंगरे, प्रशिक्षक श्रीकांत पुजारी, संभाजी वागज, राजाराम भांगे मेजर, सेवा सोसायटीचे चेअरमन अर्जुन खडके, अमोल पुजारी, आंतरराष्ट्रीय खेळाडू ओंकार वागज, भांगिरे, रवी व्यवहारे हे उपस्थित होते. या खेळाचा ग्रामीण भागात प्रसार करण्यासाठी जिल्हा संघटनेचे सचिव भीमराव बाळगे, खजिनदार इकबाल शेख सर प्रसार करण्याचा मानस घेतला आहे.
.png)
No comments:
Post a Comment