माढ्यातील सन्मती नगर मधील महिलांनी धरला मंगला गौरीचा फेर,पारंपरिक खेळ खेळत लुटला आनंद - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 22, 2023

माढ्यातील सन्मती नगर मधील महिलांनी धरला मंगला गौरीचा फेर,पारंपरिक खेळ खेळत लुटला आनंद

 माढ्यातील सन्मती नगर मधील महिलांनी धरला मंगला गौरीचा फेर,पारंपरिक खेळ खेळत लुटला आनंद 


माढा (कटूसत्य वृत्त):- माढा शहरातील सन्मती नगर मधील महिलांनी एकत्रित येऊन मंगला गौरीचा फेर धरला.लोप पावत चाललेले पारंपरिक खेळ खेळत महिलांनी आनंद लुटला. पंचमी सण  हा  महिलांचा आवडता सण.मात्र  आजच्या हायटेक  बदलत्या जीवन काळामध्ये आपल्या दररोजच्या जीवनशैलीमध्ये कुणालाही वेळ नाही जुन्या परंपरा म्हणजे गावठीपणा असे समजणाऱ्या जुन्या परंपरा पंचमी साठी धरण्यात येणारे  फिवेर गाणी म्हणणे रात्रीचे खेळ खेळणी ह्या सगळ्या गोष्टी लोप पावत चाललेल्या असतानाच  माढ्यातील  सन्मती  नगर मधील महिला मंडळातील काही महिलांनी एकत्रित येऊन  त्या परंपरा पुढे ठेवण्याचे काम सुरू केले आहे.महिलांनी मंगळागौरी चा धरला फेर,फुगडी खेळणे, एकत्रितपणे खेळ  महिलांना उत्साह प्रेरणा मिळते. महिला एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण होते यासाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याचे  महिलांनी माध्यमांशी  बोलताना सांगितले.यावेळी स्वाती उबाळे,गितांजली देशमुख,दिपाली गुंड,कुमुदिनी कापसे,वंदना गौंडरे,वैशाली जाधव यांचेसह शेकडो महिला उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages