बेदाण्याचा समावेश शालेय पोषण आहारात करण्याच्या मागणी प्रश्नी शेतकरी आक्रमक पवित्र्यात, माढ्यात शेतकरी करणार हालगीनाद व रास्ता रोको आंदोलन
माढा (कटूसत्य वृत्त):- शालेय पोषण आहारात बेदाण्याचा समावेश करावा या मागणीसाठी सोलापूर जिल्ह्यातील बेदाणा उत्पादक शेतकरी शासनदरबारी पाठपुरावा करीत आहेत.नितीन कापसे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्हातील शेतकरी एकवटले असुन लोक प्रतिनिधीच्या भेटी शिष्टमंडळ घेऊन निवेदन देऊन शालेय पोषण आहारात बेदाण्याचा समावेश करण्याची आग्रही मागणी करीत आहेत.
मात्र राज्य सरकारकडून मागणी प्रश्नी कसलीही दखल घेतली जात नसल्याने बेदाणा उत्पादक शेतकरी आक्रमक पवित्र्यात उतरले आहेत.२४ ऑगस्ट 2023 रोजी गुरुवारी सकाळी माढ्यातील छत्रपती शिवाजीमहाराज चौकात हलगी नाद व रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे लेखी निवेदन नितीन कापसे यांच्या पुढाकारातून शेतकर्यानी तहसीलदार विनोद रणवरे व पोलिस प्रशासनाला देण्यात आले. बेदाण्याचा समावेश शालेय पोषण आहारात करण्यासाठी नितीन कापसे यांनी तेलगंणाचे बिआरएस पक्षाचे मुख्यमंत्री के.सी.राव यांची भेट घेऊन द्राक्ष उत्पादक शेतकर्यांच्या व्यथा मांडली होती.यावर के.सी.राव यांनी देखील लवकरच हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते.त्यानंतर शेतकर्यांनी देखील महाराष्ट्र राज्यातील लोकप्रतिनिधींच्या भेटी घेऊन मागणीचा जोर धरला होता.बेदाण्याचा शालेय पोषण आहारात समावेश करण्याचा प्रश्न पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी मधुन माढ्याचे आमदार बबनराव शिंदेनी मांडला होता.लवकरच निर्णय घेऊ असे फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी अधिवेशनात सांगितले होते.मात्र मंत्री भुमरे ची घोषणा हवेतच विरली गेली.त्यानंतर बेदाणा शेतकर्यानी आरोग्य मंत्री डाॅ.तानाजीराव सावंत,यांचेसह अन्य मंत्री खासदार व आमदाराची भेट घेतली.मात्र सरकारने अद्याप या बाबत कसलीही पावले उचलली नसल्याने सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले असुन राज्यभरात आंदोलनाचा वणवा पेटला जाणार असुन माढ्यात आंदोलनाची पहिली ठिणगी पडणार आहे.आंदोलनाचे निवेदन देताना माढा तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकरी बहुसंख्येन उपस्थित होते.

No comments:
Post a Comment