सनराइज् इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांची रोलिंग स्केटिंग क्रीडा स्पर्धेमध्ये सरशी
साहिल पाटील याची विभागस्तरीय स्केटिंग स्पर्धेसाठी निवड
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- सध्याच्या चालू असणाऱ्या तालूका, जिल्हा तसेच विविध स्तरावरती असणाऱ्या क्रीडा स्पर्धांमध्ये श्री माऊली शिक्षण प्रसारक व समाजसेवा मंडळ संचलित सनराइज इंग्लिश मीडियम स्कूल टेंभुर्णी मधील विद्यार्थ्यांनी उत्तुंग असे यश संपादन केले आहे .विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असणाऱ्या कलागुणांची चुणूक पुन्हा एकदा सर्वांसमोर दाखवली त्याचा प्रत्यय म्हणजेच क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित जिल्हास्तर शालेय रोलर स्केटिंग क्रीडा स्पर्धा सन 2023 - 24 या स्पर्धेमध्ये सनराइज् इंग्लिश मीडियम स्कूल च्या साहिल पाटील याची विभाग स्तरावर स्केटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
संस्थेचे अध्यक्ष योगेश (बाबाराजे) बोबडे सर व संस्थेच्या सचिवा सौ सुरजाताई योगेश बोबडे मॅडम यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच त्यांच्या भविष्याच्या वाटचालीबद्दल शुभेच्छा ही दिल्या याचबरोबर प्रशालेच्या अकॅडमिक डायरेक्टर व प्रिन्सिपल शाहिदा पठाण मॅडम यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक केले विद्यार्थ्यांच्या सरावासाठी लागणारी सामग्री वेळोवेळी पुरवली जाईल विद्यार्थ्यांचा कौशल्यपूर्ण विकास होण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केली जाईल याची ग्वाही या ठिकाणी संचालक मंडळांनी दिली.
तसेच अंडर 14 एज ग्रुप मध्ये हर्षराजे तानाजी निचळ ,पृथ्वीराज संदीप देशमुख या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.तसेच अंडर 17 एज ग्रुप मध्ये सयाजी संदीप देशमुख मयुरेश बाबासाहेब ढवळे यांनीही स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला.
आगामी होणाऱ्या स्पर्धेमध्ये सुद्धा प्रशालेचे विद्यार्थी विविध प्रकारे आपली कौशल्य दाखवून क्रमांक पटकावतील असा विश्वासही शाहिदा पठाण मॅडम यांनी व्यक्त केला तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे राहुल काळे सर व गणेश देवकते सर यांचेही प्रशालेने अभिनंदन केले.

No comments:
Post a Comment