शिक्षण उपसंचलकाकडून श्रीमती सुनीता हनुमंत काळे यांचा समावेश
शालार्थ प्रणालीमध्ये करण्याचा आदेश
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- चंद्रभागाबाई यलगुलवार शाळेतील शिपाई हनुमंत विठ्ठल काळे यांनी 10 ऑगस्ट 2023 रोजी मागील 13 वर्षापासून चुकीचा शालार्थ आयडी दिल्याने पगार मिळत नाही म्हणून शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केली होती. जिल्हा प्रगशासनाने याची गंभीर दखल घेऊन मयताची पत्नी श्रीमती सुनीता हनुमंत काळे यांना तात्काळअनुकंपा तत्वावर त्याच शाळेत शिपाई सेवक पदावर भरतीचे आदेश दिले होते . त्यानुसार पुणे येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिनांक 23 ऑगस्ट 2023 रोजी श्रीमती सुनीता हनुमंत काळे यांचा समावेश शालार्थ प्राणाली मध्ये करण्यास मान्यता दिली आहे. या आदेशानूसार मयत हनुमंत काळे यांच्या पत्नी श्रीमती सुनीता हनुमंत काळे ह्या अनुकंपभरतीनुसार चंद्रभागाबाई यलगुलवार शाळेत शिपाई सेवक म्हणून प्रति महा 8 हजार रूपये मानधनावर कार्यरत राहतील . शिक्षण उपसंचालक कार्यालयाने शालार्थ प्रणाली मध्ये समावेश करण्याबाबत दिलेल्या मान्यते नंतर उर्वरित माहिती संबंधित शाळेने भरून अधिक्षक , वेतन पथक (माध्यमिक) सोलापूर यांच्या लॉग इन ला पाठवून मान्य करून घेण्याचे शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी आदेशित केले आहे.
.jpg)
No comments:
Post a Comment