क्रांतीदिनी भाजपा कार्यकर्त्यांनी घेतली ‘पंचप्रण’ शपथ ! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 9, 2023

क्रांतीदिनी भाजपा कार्यकर्त्यांनी घेतली ‘पंचप्रण’ शपथ !

 क्रांतीदिनी भाजपा कार्यकर्त्यांनी घेतली ‘पंचप्रण’ शपथ !

 


मुंबई  (कटूसत्य वृत्त):-भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात क्रांतीदिनाचे औचित्य साधत पक्ष कार्यकर्त्यांनी बुधवारी देशसेवा आणि विकासासाठी समर्पित होण्याची 'पंचप्रणशपथ घेतली. भाजपा मुंबई अध्यक्ष आ.आशिष शेलार यांनी कार्यकर्त्यांना शपथ दिली. यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारीआ. श्रीकांत भारतीयआ. मनीषा चौधरीआ. विद्या ठाकूर,आ.भारती लव्हेकर, प्रदेश मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरेसहप्रभारी सुमंत घैसासमहिला मोर्चा प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघसह-मुख्य प्रवक्ते अजित चव्हाण,प्रवक्ते गणेश हाके,कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णीकार्यालय सहसचिव भरत राऊत आदी उपस्थित होते.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने भाजपातर्फे ‘मेरी माटी मेरा देश’ हे अभियान राबवले जात आहे. त्याचा भाग म्हणून कार्यकर्त्यांनी ‘पंचप्रण’ शपथ घेतली. ‘मेरी माटी मेरा देश’ या अभियानाच्या माध्यमातून गावागावातील माती गोळा करून दिल्ली येथे स्मारक उभारण्यात येणार असल्याची माहिती भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages