कोंढारकी येथे नेहरू युवा मंडळाच्या वतीने वसुधा वंदन व वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 9, 2023

कोंढारकी येथे नेहरू युवा मंडळाच्या वतीने वसुधा वंदन व वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न

 कोंढारकी येथे नेहरू युवा मंडळाच्या वतीने वसुधा वंदन व वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न

 


पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- पंढरपूर तालुक्यातील कोंढारकी येथे नेहरू युवा मंडळ यांच्यावतीने जिल्हा परिषद शाळेत वसुधा वंदन वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला केंद्र शासनाच्या वतीने मेरी माटी मेरा देश वसुधा वंदन वृक्षारोपण करण्यात आले. कोंढारकी येथील जिल्हा परिषद शाळेत हा उपक्रम राबवण्यात आला.
    यावेळी महिला सरपंच प्रणोती वाघमारे, भारतीय सैनिक मेजर सनम माने, राजाराम सूर्यवंशी, संजय फुगारे , बाजीराव माने, दीपक माने, भीमराव शेवडे , अरुण दांडगे, प्रेम माने, धनाजी घाडगे, आरोग्य सेविका नंदा चंदनशिवे जि प शाळेचे मुख्याध्यापक विजय भोसले गुरुजी दत्तात्रय शिखरे गुरुजी, सुप्रिया शिंदे नेहरू युवा मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र फुगारे नेहरू मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी गावातील सर्व ग्रामस्थांनी मेरी माटी मेरा देश खड्डे खांदून वसुधा वंदन वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पाडला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages